Lokmat Money > बिझनेस न्यूज > काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?

काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?

Intern Salary Mumbai: बहुतेक कंपन्या इंटर्नशिप दरम्यान पगाराशिवाय काम करुन घेणं पसंत करतात, तर मुंबईतील एका ट्रेडिंग कंपनीनं इंटर्नला दरमहा ₹१२.५ लाख पगाराची ऑफर देऊन देशभरात खळबळ उडवून दिली आहे. ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 11:05 IST2025-09-20T11:04:13+5:302025-09-20T11:05:09+5:30

Intern Salary Mumbai: बहुतेक कंपन्या इंटर्नशिप दरम्यान पगाराशिवाय काम करुन घेणं पसंत करतात, तर मुंबईतील एका ट्रेडिंग कंपनीनं इंटर्नला दरमहा ₹१२.५ लाख पगाराची ऑफर देऊन देशभरात खळबळ उडवून दिली आहे. ह

mumbai trading company IMC Trading BV gives Intern package of Rs 12 5 lakh per month know what his role highest pay | काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?

काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?

Intern Salary Mumbai: अनेक कंपन्या आपल्याकडे घेतलेल्या इंटर्नर्सना सहसा कोणत्याही पगाराविना काम करुन घेतात. तर मुंबईतील एका ट्रेडिंग कंपनीनं इंटर्नला दरमहा ₹१२.५ लाख पगाराची ऑफर देऊन देशभरात खळबळ उडवून दिली आहे. हे एन्ट्री-लेव्हल जॉबसाठी दिलं जाणारं आतापर्यंतचे सर्वोच्च पॅकेज आहे. कंपनीने गेल्या वर्षीही त्यांच्या इंटर्नर्सना भरघोस पॅकेज दिलं होतं, परंतु या वर्षीची ऑफर गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे.

अ‍ॅमस्टरडॅमस्थित मल्टीनॅशनल कंपनी आयएमसी ट्रेडिंग बीव्हीनं (IMC Trading BV) भारतात काम करणाऱ्या त्यांच्या इंटर्नना दरमहा ₹१२.५ लाख पगार देऊ केला आहे, जो २०२४ पेक्षा तिप्पट वाढला आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार Quadeye त्यांच्या नवीन कर्मचाऱ्यांना ₹७.५० लाख पगार देऊ केला आहे, जो गेल्या वर्षीपेक्षा ५०% जास्त आहे. भारतीय फायनान्स प्रोफेशनल्सना साधारणपणे सरासरी ₹७००,००० वार्षिक पॅकेज मिळतं हे लक्षात घेता या ऑफर महत्त्वपूर्ण मानल्या जातात.

डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

ट्रेडिंगमध्ये घसरण तरी मोठी ऑफर

कडक नियमांमुळे डेरिव्हेटिव्ह्जमधील व्यापार गेल्या वर्षीच्या शिखरावरुन जवळजवळ ४०% कमी झाला असू ट्रेडिंगमध्ये घट झाली असली तरी, अजूनही भरतीसाठी मोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. हे मुख्यत्वे जगातील आघाडीच्या डेरिव्हेटिव्ह्ज बाजारपेठेतील व्हॉल्यूममध्ये सतत वाढ झाल्यामुळे आहे. २०२४ मध्ये अल्गोरिदम वापरून त्यांनी ७ अब्ज डॉलर्स (अंदाजे ६०,००० कोटी रुपये) नफा कमावला.

नफा कमावून देणाऱ्या ट्रेडर्सची मोठी मागणी

क्वांटचे सह-प्रमुख डॅनियल वेज म्हणतात की बाजारात नफा कमावणाऱ्या ट्रेडर्सची मागणी मोठी आहे. "आम्ही जवळजवळ दर महिन्याला एक नवीन डेस्क तयार करत आहोत." "आमचं ध्येय टॉप ट्रेडरना शोधणं आणि त्यांना आमच्या टीममध्ये जोडणं हे आहे. हे साध्य करण्यासाठी, आम्ही सतत ट्रेडिंग रिसर्च करणारे इंजिनीअर्स शोधत असतो. बाजार नियामक सेबीच्या सततच्या तपासणीमुळे ही मागणी वाढली आहे. जेन स्ट्रीट ग्रुप एलएलसीभोवतीच्या अलिकडच्या वादामुळे अशा टॉप ट्रेडर्सची मागणी आणखी वाढली आहे," असंही ते म्हणाले.

Web Title: mumbai trading company IMC Trading BV gives Intern package of Rs 12 5 lakh per month know what his role highest pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.