रिलायन्स इंडस्ट्रीज आणि NVIDIA यांच्यात अॅडव्हान्स आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) संदर्भात मोठा करार झाला आहे. या भागीदारी अंतर्गत, दोन्ही कंपन्या भारताचं स्वतःचं फाउंडेशन लार्ज लँग्वेज मॉडेल विकसित करतील, ज्याचा वापर जनरेटिव्ह एआय अॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी केला जाईल. NVIDIA ही जगातील सर्वात मोठी चिप उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.
भारताच्या चिप आणि एआयच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी या कराराची मोठी मदत होऊ शकते. दोन्ही कंपन्यांनी शुक्रवारी यासंदर्भातल एक निवेदन जारी केलंय. या भागीदारी अंतर्गत, भारतात जनरेटिव्ह एआय अॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी स्वदेशी फाउंडेशन लार्ज लँग्वेज मॉडेल विकसित केलं जाईल, जे भारतातील विविध भाषांमध्ये प्रशिक्षित असेल असं निवेदनात म्हटलंय.
AI इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काम करणार
दोन्ही कंपन्या भारतात AI इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी एकत्र काम करतील जी आजच्या भारतात असलेल्या सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटरपेक्षाही अधिक शक्तिशाली असेल. NVIDIA यासाठी क्लाउडमध्ये त्यांच्या अत्याधुनिक चिप आणि AI सुपरकॉम्प्युटिंग सेवांपर्यंत प्रवेश देईल.
AI इन्फ्रान्स्ट्रक्चर AI-रेडी कंप्युटिंग डेटा सेंटर्समध्ये होस्ट केले जाईल, यानंतर त्याला 2,000 मेगाव्हॅटपर्यंत पर्यंत वाढवलं जाईल. हे सर्व जिओ करणार आहे. त्यांच्याकडे मोबाईल, 5G स्पेक्ट्रम, फायबर नेटवर्कशी निगडीत व्यापक ऑफर्स आणि अनुभव आहे.
