lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Reliance Industries New Deal : रिलायन्स इंडस्ट्रीची मोठी डील, 5792 कोटी रुपयांत नॉर्वेचा REC ग्रुपच घेतला विकत!

Reliance Industries New Deal : रिलायन्स इंडस्ट्रीची मोठी डील, 5792 कोटी रुपयांत नॉर्वेचा REC ग्रुपच घेतला विकत!

Reliance Industries New Big Deal : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (आरआयएल) कंट्रोल असलेली सहायक कंपनी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने (आरएनईएसएल) चायना नॅशनल ब्लूस्टार (ग्रुप) कंपनी लिमिटेडकडून, आरईसी सोलार होल्डिंग्स एएस (आरईसी ग्रुप)च्या 100 टक्के भागिदारीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 04:53 PM2021-10-10T16:53:02+5:302021-10-10T16:54:02+5:30

Reliance Industries New Big Deal : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (आरआयएल) कंट्रोल असलेली सहायक कंपनी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने (आरएनईएसएल) चायना नॅशनल ब्लूस्टार (ग्रुप) कंपनी लिमिटेडकडून, आरईसी सोलार होल्डिंग्स एएस (आरईसी ग्रुप)च्या 100 टक्के भागिदारीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे.

Mukesh Ambani Reliance Industries Ltd new big deal acquires rec solar holdings for 771 million | Reliance Industries New Deal : रिलायन्स इंडस्ट्रीची मोठी डील, 5792 कोटी रुपयांत नॉर्वेचा REC ग्रुपच घेतला विकत!

Reliance Industries New Deal : रिलायन्स इंडस्ट्रीची मोठी डील, 5792 कोटी रुपयांत नॉर्वेचा REC ग्रुपच घेतला विकत!

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रिजने सोलार एनर्जीच्या क्षेत्रात एक मोठी डील केली आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलारने (Reliance New Energy Solar) रविवारी 10 ऑक्टोबरला यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी 5792 कोटी रुपयांत (771 मिलियन डॉलर) आरईसी सोलर होल्डिंग्सचे (REC Solar Holdings ) अधिग्रहण केले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (आरआयएल) कंट्रोल असलेली सहायक कंपनी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने (आरएनईएसएल) चायना नॅशनल ब्लूस्टार (ग्रुप) कंपनी लिमिटेडकडून, आरईसी सोलार होल्डिंग्स एएस (आरईसी ग्रुप)च्या 100 टक्के भागिदारीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलारने बीएसई फायलिंगमध्ये ही माहिती दिली.

रिलायन्ससाठी महत्वाची डील - 
जागतिक स्तरावर फोटोव्होल्टिक (पीव्ही) मॅन्युफॅक्चरिंग प्लेयर बनण्यासाठी रिलायन्सच्या न्यू एनर्जी व्हिजनसाठी हे अधिग्रहण अत्यंत महत्वाचे आहे. हे अधिग्रहण रिलायन्स  ग्रुपला 2030 पर्यंत सोलर एनर्जीचे 100 गीगाव्हॅट उत्पादनाचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी अत्यंत उपयुक्त सिद्ध होईल. भारताचेही याच वर्षापर्यंत Renewable Energy चे 450 गीगाव्हॅट उत्पादनाचे लक्ष आहे.

1996 मध्ये झाली होती REC ची स्थापना -
नॉर्वेमध्ये 1996 साली RECची स्थापना झाली होती. याचे operational headquarters सिंगापूरमध्ये आहे. याच बरोबर उत्तर अमेरिका, यूरोप, ऑस्ट्रेलिया आणि आशिया प्रशांतमध्ये या ग्रुपचे रिजनल केंद्र आहेत. या कंपनीकडे 600 हून अधिक युटिलिटी आणि डिझाइन पेटंट्स (utility and design patents) आहेत. यांपैकी 446 ला मंजुरी मिळाली आहे. REC प्रामुख्याने Research आणि Development फोकस कंपनी आहे.

Web Title: Mukesh Ambani Reliance Industries Ltd new big deal acquires rec solar holdings for 771 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.