lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > MTNL Annual Prepaid Plan: जबरदस्त प्लॅन! २५ रुपयांत ३६५ दिवसांची वैधता; जिओ, एअरटेलला धुळ चारणार

MTNL Annual Prepaid Plan: जबरदस्त प्लॅन! २५ रुपयांत ३६५ दिवसांची वैधता; जिओ, एअरटेलला धुळ चारणार

Annual Prepaid Plan: ज्यांनी लाईफटाईम व्हॅलिडीटीच्या आश्वासनांची कार्ड घेतली त्यांनाही आता दर महिन्य़ाला व्हॅलिडीटी वाढविण्याची रिचार्ज मारावी लागत आहेत. यामुळे ज्यांचे वर्ष एका रिचार्जवर निघून जायचे त्यांना आता दर महिन्याल्या त्याच्या दुप्पट, तिप्पट रिचार्ज मारावे लागत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 02:46 PM2022-04-26T14:46:31+5:302022-04-26T14:46:56+5:30

Annual Prepaid Plan: ज्यांनी लाईफटाईम व्हॅलिडीटीच्या आश्वासनांची कार्ड घेतली त्यांनाही आता दर महिन्य़ाला व्हॅलिडीटी वाढविण्याची रिचार्ज मारावी लागत आहेत. यामुळे ज्यांचे वर्ष एका रिचार्जवर निघून जायचे त्यांना आता दर महिन्याल्या त्याच्या दुप्पट, तिप्पट रिचार्ज मारावे लागत आहे. 

MTNL Annual Prepaid Plan: Great Plan! 365 days validity at Rs. 25; internet, calling and talktime no one can give in Todays Date | MTNL Annual Prepaid Plan: जबरदस्त प्लॅन! २५ रुपयांत ३६५ दिवसांची वैधता; जिओ, एअरटेलला धुळ चारणार

MTNL Annual Prepaid Plan: जबरदस्त प्लॅन! २५ रुपयांत ३६५ दिवसांची वैधता; जिओ, एअरटेलला धुळ चारणार

सध्या देशात महागाईचे दिवस सुरु आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून टेलिकॉम क्षेत्रात प्रीपेड आणि पोस्टपेड असे दोन प्रकार असताना जिओने प्रवेश करून प्रीपेड मोबाईल सेवेची ऐशीतैशी केली आहे. यामुळे ज्यांनी लाईफटाईम व्हॅलिडीटीच्या आश्वासनांची कार्ड घेतली त्यांनाही आता दर महिन्य़ाला व्हॅलिडीटी वाढविण्याची रिचार्ज मारावी लागत आहेत. यामुळे ज्यांचे वर्ष एका रिचार्जवर निघून जायचे त्यांना आता दर महिन्याल्या त्याच्या दुप्पट, तिप्पट रिचार्ज मारावे लागत आहे. 

याला बीएसएनएलदेखील बळी पडली आहे. आता बीएसएनएलची देखील व्हॅलिडीटी वाढविण्यासाठी रिचार्ज मारावी लागत आहेत. अशातच पैशापैशांमध्ये फरक ठेवून आम्ही किती स्वस्त याची स्पर्धा रंगली आहे. असे असताना एक कंपनी २५ रुपयांत एक वर्षाची व्हॅलिडीटी देत आहे. आजच्या युगात तुम्ही यावर विश्वासही ठेवणार नाही, परंतू ते खरे आहे. 

ही कंपनी आहे एमटीएनएल. MTNL ने २५ रुपयांता ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी देणारा प्लॅन आणला आहे. यामध्ये डेटा, कॉलिंगसह अन्य काही फायदे मिळणार आहेत. हे २५ रुपयांचे रिचार्ज मारल्यावर पहिल्या तीस दिवसांसाठी 10 रुपये टॉकटाईम, १०० लोकल एमटीएनएल मिनिट्स आणि ५० एमबी डेटा देण्यात येणार आहे. लोकल आणि एसटीडी कॉलिंगसाठी १/२ पैसा प्रति सेकंद आकारले जात आहेत. तसेच डेटा ३ पैसे प्रति एमबी चार्ज केला जाणार आहे. 

जर तुम्ही या किंमतीतील इतर कंपन्यांबद्दल बोलायचे झाले तर, 365 दिवसांची वैधता, तर तुम्हाला डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळणार नाही. Jio बद्दल बोलायचे झाले तर कंपनी 20 रुपयांचा प्लान ऑफर करत आहे, ज्यामध्ये 14.95 रुपयांचा टॉकटाइम दिला जात आहे. त्याचवेळी Airtel आणि Vi बद्दल बोलायचे झाले तर या कंपन्या देखील या किमतीत समान फायदा देतात.

Web Title: MTNL Annual Prepaid Plan: Great Plan! 365 days validity at Rs. 25; internet, calling and talktime no one can give in Todays Date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.