lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोबाईलवरून पेमेंट करणे वाढले अन् डेबिट-क्रेडिट कार्ड कंपन्यांना टेन्शन! बँकांचे उत्पन्न घटले

मोबाईलवरून पेमेंट करणे वाढले अन् डेबिट-क्रेडिट कार्ड कंपन्यांना टेन्शन! बँकांचे उत्पन्न घटले

यूपीआयने व्यवहाराची पद्धतच बदलली; व्हिसा-मास्टरकार्डला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 06:57 AM2022-05-12T06:57:06+5:302022-05-12T06:57:16+5:30

यूपीआयने व्यवहाराची पद्धतच बदलली; व्हिसा-मास्टरकार्डला आव्हान

Mobile Payments Increase Tension for Debit-Credit Card Companies! | मोबाईलवरून पेमेंट करणे वाढले अन् डेबिट-क्रेडिट कार्ड कंपन्यांना टेन्शन! बँकांचे उत्पन्न घटले

मोबाईलवरून पेमेंट करणे वाढले अन् डेबिट-क्रेडिट कार्ड कंपन्यांना टेन्शन! बँकांचे उत्पन्न घटले

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सध्या देशामध्ये डिजिटल पेमेंट प्रणालीची क्रांती पाहायला मिळत असून, यामुळे व्यवहाराची पद्धतच पूर्णपणे बदलली गेली आहे. यूपीआय व्यवहार याला कारणीभूत ठरले असून, त्याच्या वापरात प्रत्येक महिन्यात मोठी वाढ होत आहे.

मार्च महिन्यात यूपीआय व्यवहार गेल्या वर्षीच्या तुलनेत ९८ टक्क्यांनी आणि व्यवहार मूल्य ९२ टक्क्यांनी वाढले आहे. हीच वाढ एप्रिलमध्येही कायम राहिली आहे. तर दुसरीकडे व्हिसा आणि मास्टरकार्डचा वापर कमी झाल्याने बँका चिंतेत आहेत.

कार्डच्या नावाखाली ग्राहकांकडून मोठी कमाई बँकांना होत असे. क्रेडिट-डेबिट कार्ड बाजारावर ताबा मिळवलेले व्हिसा आणि मास्टरकार्डही सध्याच्या परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करत आहेत. रिझर्व्ह बँकने इंटरनेट नसतानाही यूपीआय व्यवहार करण्याची सोय उपलब्ध केली आहे. जर तुमच्याकडे साधा फिचर फोन असेल तरी तुम्ही यूपीआय व्यवहार करू शकता. यामुळे ग्रामीण भागात मोठा फायदा होणार आहे.

यूपीआयच्या मदतीने सर्वांचे चालते दुकान
n गुगल पे पासून फोन पेपर्यंत सर्वजण यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार सेवा देत आहेत. 
n पेमेंट करण्याबाबत 
सर्वांचे दुकान यूपीआयचे दुकान यूपीआयच्या मदतीने चालू आहे. 
n यूपीआय व्यवहारांमुळे 
सामान्य ग्राहकांपासून ते लहान लहान दुकानदारांपर्यंत सर्वजण खूश आहेत. 
n दुकानात यापूर्वी मोठ्या प्रमाणात पीओएस दिसत असतं, मात्र याची गरज यूपीआयने संपवली आहे. 

बँकांचे उत्पन्न घटले : यूपीआय व्यवहारांमध्ये झालेल्या प्रचंड वाढीने डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर कमी झाला आहे. ग्राहक रोख रकमेचा वापर अतिशय कमी प्रमाणात करत असून, यूपीआयच्या या लाटेमुळे बँकांचे उत्पन्न घटताना पाहायला मिळत आहे. तर व्हिसा आणि मास्टर कार्डसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Web Title: Mobile Payments Increase Tension for Debit-Credit Card Companies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक