Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > "...तो अधिकार तुम्हाला कुणी दिला?"; UAE च्या टॉप उद्योगपतीचं डोनाल्ड ट्रम्प यांना खुलं पत्र

"...तो अधिकार तुम्हाला कुणी दिला?"; UAE च्या टॉप उद्योगपतीचं डोनाल्ड ट्रम्प यांना खुलं पत्र

अमेरिका इस्रायलचे इराणसोबत युद्धामुळे आखाती देशांमध्ये चिंता पसरली आहे. इराणवर हल्ला करण्याचा निर्णय तुमचा होता की इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी तुमच्यावर दबाव आणला होता का असा प्रश्न लोक अमेरिकेला विचारत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 09:39 IST2026-03-06T09:38:16+5:302026-03-06T09:39:07+5:30

अमेरिका इस्रायलचे इराणसोबत युद्धामुळे आखाती देशांमध्ये चिंता पसरली आहे. इराणवर हल्ला करण्याचा निर्णय तुमचा होता की इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी तुमच्यावर दबाव आणला होता का असा प्रश्न लोक अमेरिकेला विचारत आहेत.

Middle east conflict: UAE businessman Khalaf Ahmad Al Habtoor written open letter to US president Donald Trump over Iran-US War | "...तो अधिकार तुम्हाला कुणी दिला?"; UAE च्या टॉप उद्योगपतीचं डोनाल्ड ट्रम्प यांना खुलं पत्र

"...तो अधिकार तुम्हाला कुणी दिला?"; UAE च्या टॉप उद्योगपतीचं डोनाल्ड ट्रम्प यांना खुलं पत्र

दुबई - मध्य पूर्वेत अमेरिका-इस्रायलविरुद्धइराण युद्धामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकाइस्रायलने संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ला केला. त्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या इराणने इस्रायलसह आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकन सैन्य तळांना टार्गेट केले. सौदी अरेबिया, यूएई, ओमान, कतार, कुवेत यासारख्या देशात इराणने हल्ला केला. या संपूर्ण परिस्थितीमुळे आखाती देशांमध्येही तणाव निर्माण झाला. यात UAE च्या टॉप उद्योगपतींपैकी एक अब्जाधीश उद्योगपती खलफ अहमद अल हब्तूर यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना खुले पत्र लिहून संताप व्यक्त केला आहे.

अल हब्तूर ग्रुपचे अब्जाधीश उद्योगपती यांनी पत्रात म्हटलंय की, इराणसोबतच्या युद्धात आमच्या प्रदेशाला ओढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि तुम्ही हा खतरनाक निर्णय कोणत्या आधारावर घेतला? तुम्ही ट्रिगर खेचण्यापूर्वी होणाऱ्या नुकसानीचा हिशोब लावला होता का? हा संघर्ष वाढला तर या प्रदेशातील देशांना हानी पोहोचवेल असं तुम्हाला वाटले होते का? यासारखे विविध प्रश्न त्यांनी ट्रम्प यांना विचारले आहेत.

ट्रम्प यांना विचारले परखड प्रश्न

  • हा तुमचा निर्णय होता की नेतान्याहू यांचा दबाव होता?
  • तुम्ही हल्ला करण्यापूर्वी त्यानंतर होणाऱ्या नुकसानीचा अंदाज घेतला होता का?
  • तुम्ही आखाती देशांना अशा धोक्यात आणले, जे त्यांनी कधी निवडले नव्हते.
  • तुमच्या 'बोर्ड ऑफ पीस' उपक्रमाला आखाती देशांनी निधी दिला होता. आता आमच्यावर हल्ला होत आहे. ते पैसे कुठे गेले?

 

तसेच तुम्ही कुठलेही युद्ध न करण्याचं वचन दिलं होतं. तुम्ही सात देशांमध्ये सोमालिया, इराक, येमेन, नायजेरिया, सीरिया, इराण आणि व्हेनेझुएला इथे ऑपरेशन केले. गेल्या ४०० दिवसांत तुमचे मान्यता रेटिंग ९ टक्क्यांनी घसरले आहे. तुम्ही अमेरिकन लोकांना शांततेचे वचन दिले होते. जे त्यांच्या करांमधून युद्धाला फंड देत ​​आहेत अशी टीकाही उद्योगपती यांनी ट्रम्प यांच्यावर केली.

आखाती देशांवर इराणशी युद्धाचा परिणाम 

अमेरिका इस्रायलचे इराणसोबत युद्धामुळे आखाती देशांमध्ये चिंता पसरली आहे. इराणवर हल्ला करण्याचा निर्णय तुमचा होता की इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी तुमच्यावर दबाव आणला होता का असा प्रश्न लोक अमेरिकेला विचारत आहेत. आम्ही मजबूत आहोत, संरक्षण करण्यास सक्षम आहोत आणि आमच्याकडे सैन्य आहे ते बरे, परंतु तुम्हाला आमचा प्रदेश युद्ध भूमीत बदलण्याची परवानगी कुणी दिली? असं पत्रातून विचारण्यात आले आहे.

Web Title : ईरान संघर्ष पर यूएई के अरबपति अल हबटूर ने ट्रम्प की आलोचना की

Web Summary : यूएई के खलफ अल हबटूर ने ईरान संघर्ष में क्षेत्र को शामिल करने के ट्रम्प के फैसले की आलोचना की। उन्होंने हमले के आधार और परिणामों पर सवाल उठाया, खाड़ी देशों को संभावित नुकसान पर प्रकाश डाला और 'बोर्ड ऑफ पीस' फंड के लिए जवाबदेही की मांग की।

Web Title : UAE Billionaire Al Habtoor Slams Trump Over Iran Conflict Decision

Web Summary : UAE's Khalaf Al Habtoor criticizes Trump's decision involving the region in the Iran conflict. He questions the basis and consequences of the attack, highlighting potential harm to Gulf nations and demanding accountability for the 'Board of Peace' funds.