दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने, काही महिन्यांतच दुसऱ्यांदा हजारों कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अमेरिकन कंपनीने बुधवारपासून कर्मचाऱ्यांना कपातीची नोटीस पाठवायलाही सुरुवात केली आहे. मात्र, किती कर्मचारी कपात करणार, यासंदर्भात मायक्रोसॉफ्टने अद्याप कसलेही भाष्य केलेले नाही. पण, हा आकडा गेल्या वर्षात झालेल्या चार टक्के कपातीपेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे. माध्यमांतील वृ्त्तांनुसार, हा आकडा 9,000 हून अधिक असू शकतो.
मे महिन्यात जवळपास 6000 कर्मचाऱ्यांना फटका -
महत्वाचे म्हणजे, मायक्रोसॉफ्टने मे महिन्यातही कपात केली होती. यात जवळपास 6000 कर्मचारी प्रभावित झाले होते. जून 2024 पर्यंत जगभरात मायक्रोसॉफ्टचे जवळपास 2,28,000 कर्मचारी होते. नव्या कपातीनंतर, जवळपास 15 हजार कर्मचारी कमी होतील.
माइक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांकडून AI च्या माध्यमाने, वेगवेगळ्य पातळीवर काम सुरू केले आहे. माइक्रोसॉफ्टने एक नवी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सिस्टिम सादर केली आहे.
कंपनीचा मार्च तिमाहीतील फॉर्मन्स -
माइक्रोसॉफ्टने मार्च तिमाहीसाठी 70 बिलियन डॉलरच्या महसुलावर अंदाजे २६ अब्ज डॉलर एवढे निव्वळ उत्पन्न नोंदवले. एस अँड पी ५०० निर्देशांकात मायक्रोसॉफ्ट ही सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.