Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५ वर्षांत ४७००% परतावा! 'MIC इलेक्ट्रॉनिक्स'ला रेल्वेकडून मोठं कंत्राट; शेअरला अप्पर सर्किट

५ वर्षांत ४७००% परतावा! 'MIC इलेक्ट्रॉनिक्स'ला रेल्वेकडून मोठं कंत्राट; शेअरला अप्पर सर्किट

Multibagger Share : 'मल्टीबॅगर' शेअर असलेल्या MIC Electronics मध्ये आज मोठी वाढ दिसून आली. एका बातमीनंतर, या शेअरमध्ये मोठी हालचाल दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:57 IST2026-04-02T15:56:25+5:302026-04-02T15:57:32+5:30

Multibagger Share : 'मल्टीबॅगर' शेअर असलेल्या MIC Electronics मध्ये आज मोठी वाढ दिसून आली. एका बातमीनंतर, या शेअरमध्ये मोठी हालचाल दिसून येत आहे.

MIC Electronics Share Surge Multibagger Stock Rises from 70 Paise to ₹32 in 5 Years | ५ वर्षांत ४७००% परतावा! 'MIC इलेक्ट्रॉनिक्स'ला रेल्वेकडून मोठं कंत्राट; शेअरला अप्पर सर्किट

५ वर्षांत ४७००% परतावा! 'MIC इलेक्ट्रॉनिक्स'ला रेल्वेकडून मोठं कंत्राट; शेअरला अप्पर सर्किट

MIC Electronics : शेअर बाजारात असे काही 'छुपे रुस्तम' शेअर्स असतात जे गुंतवणूकदारांचे नशीब बदलून टाकतात. असाच एक चमत्कार MIC इलेक्ट्रॉनिक्स या शेअरने करून दाखवला आहे. एकेकाळी अवघ्या ७० पैशांना मिळणारा हा शेअर आज ३२ रुपयांच्या पार पोहोचला आहे. भारतीय रेल्वेकडून मिळालेल्या एका नवीन 'वर्क ऑर्डर'मुळे या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजीचे वारे वाहू लागले असून, गुंतवणूकदारांनी या शेअरवर उड्या घेतल्या आहेत.

रेल्वेकडून मिळाले २.१२ कोटींचे कंत्राट
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 'ईस्ट कोस्ट रेल्वे' झोनकडून कंपनीला सुमारे २.१२ कोटी रुपयांचे नवीन कंत्राट मिळाले आहे. संबलपूर विभागातील स्थानकांवर कोच इंडिकेशन बोर्ड आणि ट्रेन इंडिकेशन बोर्ड बसवण्याची जबाबदारी कंपनीवर सोपवण्यात आली आहे. हे काम पुढील ६ महिन्यांत पूर्ण करायचे आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये कंपनीला हावडा विभागाकडून ४५ कोटींचे आणि फिरोजपूर विभागाकडून १.४५ कोटींचे काम मिळाले होते. रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात कंपनीचे वर्चस्व वाढत असल्याचे हे संकेत आहेत.

५ वर्षांत ४७००% परतावा; १ लाखाचे झाले ४८ लाख!
लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांसाठी हा शेअर सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरला आहे. ५ वर्षांपूर्वी या शेअरची किंमत केवळ ७० पैसे होती, जी आज ३२.४० रुपयांवर पोहोचली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांपूर्वी या कंपनीत १ लाख रुपये लावले असते आणि ते राखून ठेवले असते, तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य ४८ लाख रुपये झाले असते.

वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात ३% वाढीची शक्यता; तुमच्या पगारात किती वाढ होणार?

चढ-उतार आणि सध्याची स्थिती
गेल्या काही काळापासून या शेअरमध्ये नफावसुली पाहायला मिळत होती. गेल्या ६ महिन्यांत हा शेअर ४६ टक्क्यांनी घसरला आहे, तर २०२६ मध्ये आतापर्यंत २३ टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र, रेल्वेच्या कंत्राटाची बातमी येताच बुधवारी या शेअरला ५% चे अप्पर सर्किट लागले आणि तो ३१.४६ वर बंद झाला. आज गुरुवारी देखील हा शेअर सुमारे ३ टक्क्यांनी वधारून ३२.४० रुपयांवर व्यवहार करत आहे.

Web Title : रेलवे अनुबंध से MIC इलेक्ट्रॉनिक्स 5 वर्षों में 4700% बढ़ा!

Web Summary : ₹2.12 करोड़ का रेलवे अनुबंध मिलने के बाद MIC इलेक्ट्रॉनिक्स का शेयर उछला। शेयर की कीमत पांच वर्षों में 70 पैसे से बढ़कर ₹32.40 हो गई, जिससे 4700% रिटर्न मिला। रेलवे बुनियादी ढांचा परियोजनाओं को सुरक्षित करना कंपनी के विकास का संकेत है।

Web Title : MIC Electronics Soars 4700% in 5 Years with Railway Contract!

Web Summary : MIC Electronics share jumps after securing ₹2.12 crore railway contract. The share price rose from 70 paise to ₹32.40 in five years, delivering 4700% returns. Securing railway infrastructure projects signals company's growth, boosted by recent upper circuit surge.