भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, अशातच देशातील करोडपतींच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचा मर्सिडीज बेंझ आणि हुरुन इंडिया वेल्थ यांचा अहवाल आला आहे.
ज्या लोकांची ८.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे, अशा लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली आहे. २०२१ मध्ये अशी ४.५८ लाख कुटुंबे होती. २०२५ पर्यंत या लोकांच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अहवालानुसार भारतात आता साडेआठ कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्यांची संख्या ८.७१ लाख एवढी झाली आहे.
सर्वाधिक करोडपती हे मुंबईत राहत आहेत. या ८.७१ लाखपैकी १.४२ लाख कुटुंबे ही एकट्या मुंबईत राहत आहेत. दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ३१,६०० कुटुंबांसह बेंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यांचा विचार केल्यास करोडपती कुटुंबात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात १.७८ लाख करोडपती कुटुंबे राहत आहेत. तसेच राज्याचा राज्याचा GSDP ५५% ने वाढला आहे.
एमबीएचएक्स निर्देशांक हा मर्सिडीज-बेंझ विक्री, नवीन अब्जाधीशांची संख्या, सेन्सेक्सची कामगिरी आणि जीडीपी यांचे एकत्रीकरण आहे. या इंडेक्समध्ये जवळजवळ २००% वाढ नोंदविली गेली आहे.