Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mehul Choksi : मेहुल चोक्सीकडून आतापर्यंत किती वसूल केले? ईडीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

Mehul Choksi : मेहुल चोक्सीकडून आतापर्यंत किती वसूल केले? ईडीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

Mehul Choksi PNB Fraud : पंजाब नॅशनल बँकेत १३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 11:24 IST2025-04-14T11:23:08+5:302025-04-14T11:24:10+5:30

Mehul Choksi PNB Fraud : पंजाब नॅशनल बँकेत १३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे.

mehul choksi pnb fraud what-has happened so far in the ed investigation how much money has been recovered | Mehul Choksi : मेहुल चोक्सीकडून आतापर्यंत किती वसूल केले? ईडीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

Mehul Choksi : मेहुल चोक्सीकडून आतापर्यंत किती वसूल केले? ईडीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

Mehul Choksi PNB Fraud : भारतीय बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून परदेशी पळालेल्या उद्योगपतींभोवती फास आवळला जात आहे. यापूर्वी पळपुट्या विजय माल्ल्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त करुन तिची लिलाव करण्यात आला. तर हिरे व्यापारी नीरव मोदी याचीही शेकडो कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये आता आणखी एका नावाची भर पडणार आहे. पंजाब नॅशनल बँकेत १३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. भारतीय बँकिंग क्षेत्रातील हा सर्वात मोठा घोटाळा होता, ज्याची चौकशी सीबीआय आणि ईडीसह अनेक एजन्सी करत आहेत. 

या संपूर्ण प्रकरणात, पीडितांना मालमत्ता परत मिळावी यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले होते. मेहुल चोक्सी प्रकरणात जप्त केलेल्या मालमत्तेचे मुद्रीकरण करण्यासाठी ईडीने पीएनबी आणि आयसीआयसीआय बँकेसह मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात संयुक्त अर्ज दाखल केला होता.

१२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्तेचा लिलाव होणार?
न्यायालयाने तसाप एजन्सीचा अर्ज स्वीकारत २५६५.९० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मुद्रीकरण करण्यास परवानगी दिली होती. या आदेशानंतर, मालमत्ता त्यांच्या हक्काच्या मालकांना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेत आतापर्यंत, मेहुल चोक्सीच्या कंपनी गीतांजली जेम्सची १२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता लिक्विडेटरकडे सुपूर्द करण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबईतील फ्लॅट आणि SEEPZ परिसरात असलेले दोन कारखाने आणि गोदामे समाविष्ट आहेत. उर्वरित मालमत्तांचे पुनर्संचयित करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.

बँकेतील अधिकाऱ्यांच्या मदतीने फसवणूक
तपासात असे दिसून आले की मेहुल चोक्सीने २०१४ ते २०१७ दरम्यान पीएनबी अधिकाऱ्यांसोबत मिळून बँकेची फसवणूक केली होती. अधिकाऱ्यांच्या मदतीने लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज आणि फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट जारी केले होते, ज्यामुळे बँकेचे ६०९७.६३ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. एवढेच नाही तर चोक्सीने आयसीआयसीआय बँकेकडून मोठे कर्ज घेतले असून ते परत केले नाही.

ईडीने १३६ हून अधिक ठिकाणी छापे
आतापर्यंत, ईडीने या प्रकरणात देशभरातील १३६ हून अधिक ठिकाणी छापे टाकले असून ५९७.७५ कोटी रुपयांचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. याशिवाय, १९६८.१५ कोटी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये भारत आणि परदेशातील मालमत्ता, वाहने, बँक खाती, कारखाने, शेअर्स आणि दागिने यांचा समावेश आहे.

वाचा - अखेर काय आहे ट्रम्प यांचा प्लान? आता यू-टर्न घेत म्हटलं, "कोणीही सूटणार नाही, सर्वच देश निशाण्यावर..."

कोणत्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या?
१० सप्टेंबर २०२४ च्या न्यायालयाच्या आदेशानुसार, ईडी आणि बँक संयुक्तपणे जप्त केलेल्या मालमत्तांचे मूल्यांकन आणि लिलाव करत आहेत. लिलावातून मिळणारी रक्कम संबंधित बँकांमध्ये एफडीच्या स्वरूपात जमा केली जाईल. आतापर्यंत, गीतांजली जेम्स लिमिटेडच्या सहा मालमत्ता - मुंबईतील खेनी टॉवरमधील फ्लॅट (सुमारे २७ कोटी रुपये किमतीचे) आणि सीप्झमधील इतर दोन मालमत्ता (एकूण ९८.०३ कोटी रुपये किमतीच्या) - लिक्विडेटरकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. आता न्यायालयाच्या आदेशानुसार उर्वरित मालमत्तांच्या जीर्णोद्धाराचे कामही सुरू आहे.

Web Title: mehul choksi pnb fraud what-has happened so far in the ed investigation how much money has been recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.