Meesho IPO Listing Price Today: सॉफ्टबँकचा पाठिंबा असलेली ई-कॉमर्स कंपनी 'मीशो'च्या शेअर्सनी आज, १० डिसेंबर रोजी शेअर बाजारात तुफान एन्ट्री केली. आयपीओचा अपर प्राईज बँड १११ रुपये होता, तर कंपनीचा शेअर बीएसईवर १६१ रुपयांवर लिस्ट झाला. परिणामी, आयपीओमध्ये शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगवर ४५ टक्क्यांचा जबरदस्त परतावा मिळाला. मीशोच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आणि ग्रे मार्केट प्रीमियमने देखील हाय लिस्टिंग गेनचे संकेत दिले. ब्रोकरेज हाऊसेस कंपनीच्या दृष्टिकोनाबद्दल सकारात्मक आहेत.
८२ पट झालेला सबस्क्राईब
मीशोच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. कंपनीचा आयपीओ एकूण ८२ पट सबस्क्राइब झाला. आयपीओ रिटेल कॅटेगरीमध्ये १९.८९ पट, एनआयआय कॅटेगरीमध्ये ३९.८५ पट आणि क्यूआयबी कॅटेगरीमध्ये १२३.३४ पट सबस्क्रिप्शन मिळालं. एसबीआय सिक्युरिटीजच्या मते, मीशो झीरो-कमिशन मॉडेलवर काम करते आणि तिचा बहुतेक महसूल लॉजिस्टिक्स आणि जाहिरातींमधून मिळवते. कंपनी अजूनही तोट्यात आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून यात पॉझिटिव्ह कॅश फ्लो आहे.
पत्नीसोबत Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पाहा डिटेल्स
मीशोने आर्थिक वर्ष २५ मध्ये २,४८७ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत (१HFY२६) ७२ कोटी रुपये कर भरला. हा कर आता पूर्ण झालेल्या बिझनेस कॉम्बिनेशन इव्हेंटमुळे आकारण्यात आला होता. त्यामुळे, इतक्या मोठ्या कराची रक्कम पुन्हा आकारली जाण्याची शक्यता कमी आहे, ज्यामुळे कंपनीचं नुकसान कमी होण्यास मदत होऊ शकते. ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की टेक, मार्केटिंग आणि इंजीनिअरिंगवरील खर्च सुरूच राहिल्यानं कंपनीसाठी नफा सुधारणं अत्यंत महत्त्वाचं असेल.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
