Lokmat Money > बिझनेस न्यूज > म्युच्युअल फंडालाच करा मित्र!

म्युच्युअल फंडालाच करा मित्र!

गुंतवणूक करताना एकाच प्रकारातील म्युच्युअल फंडऐवजी विविध प्रकारातील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आर्थिक जोखीम विभागते.  गुंतवणूक करताना अधिकृत गुंतवणूकदारांचा सल्ला अवश्य घ्यावा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:32 IST2025-08-04T11:29:56+5:302025-08-04T11:32:01+5:30

गुंतवणूक करताना एकाच प्रकारातील म्युच्युअल फंडऐवजी विविध प्रकारातील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आर्थिक जोखीम विभागते.  गुंतवणूक करताना अधिकृत गुंतवणूकदारांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Make mutual funds your friends | म्युच्युअल फंडालाच करा मित्र!

म्युच्युअल फंडालाच करा मित्र!

प्रत्येकाचे स्वप्न असते की पैसे योग्य ठिकाणी गुंतवून आर्थिक सुरक्षित होण्याचे. त्यासाठी विविध गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असतात. या पर्यायांपैकी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक हा पर्याय आपल्याला आर्थिक स्वातंत्र्याकडे नेऊ शकतो. 

कमी वयात सुरू करा आणि दीर्घकाळ गुंतवणूक करा...  
गुंतवणूक खरे तर दीर्घ काळासाठी असावी. यातून आपल्याला मिळतो चक्रवाढ पद्धतीने परतावा. यालाच पॉवर ऑफ कंपाउंडिंग असे म्हणतात. कमी वयात म्युच्युअल फंडाला मित्र बनवा. त्याचेशी छान दोस्ती करा. ही दोस्ती प्रत्येक वर्षी अधिक घट्ट करा. मैत्रीतले प्रेम वाढावा. म्हणजेच म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक दरवर्षी किमान ५ टक्के  वाढवत राहा. याचा फायदा भविष्यात उत्तम धनसंचय करण्यासाठी होतो. 

म्युच्युअल फंडमधील विविधता आवश्यक ... 
दीर्घकाळ गुंतवणूक करताना लार्ज कॅप / मिड कॅप / स्मॉल कॅप / हायब्रीड / फोकस / सेक्टर असे विविध पर्याय उपलब्ध असतात. आपले वय, जोखीम घेण्याची तयारी आणि क्षमता यावर नेमका कोणता म्युच्युअल फंड निवडावा हे ठरविता येते.  गुंतवणूक करताना एकाच प्रकारातील म्युच्युअल फंडऐवजी विविध प्रकारातील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आर्थिक जोखीम विभागते.  गुंतवणूक करताना अधिकृत गुंतवणूकदारांचा सल्ला अवश्य घ्यावा.

गुंतवणुकीचा आढावा अवश्य घ्या ... 
म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा आढावा घेणे आवश्यक आहे. आवश्यक वेळेस म्युच्युअल फंड स्विच करता येतो. उदा. लार्ज कॅपमधून स्मॉल कॅप किंवा स्मॉल कॅपमधून मिड कॅप असे. बाजारातील संधी कुठे आहेत यावर याचा निर्णय घेता येतो. यासाठी तद्न्य अधिकृत सल्लागार योग्य मार्गदर्शन करू शकतात. 

एसआयपी नंतर एसडब्ल्यूपी... 
दीर्घकाळ एसआयपी केल्यानंतर मोठा धनसंचय साध्य होईल. यातूनच आयुष्याच्या उत्तरार्धात आवश्यक रक्कम प्रत्येक महिन्यास काढणे याला सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन असे म्हणतात. अशा पद्धतीने म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचे नियोजन करावे. यामुळे गुंतवणूकदारांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणे शक्य होते. यामुळे  म्युच्युअल फंडास संपूर्ण आयुष्यासाठी मित्र बनविणे सही है.

Web Title: Make mutual funds your friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.