Lokmat Money > बिझनेस न्यूज > आधी ३ कंपन्यांच्या बोर्डावरुन हटवलं अन्.. रेमंड ग्रुपमध्ये मोठा बदल, गौतम सिंघानियांच्या पत्नीचा मोठा निर्णय

आधी ३ कंपन्यांच्या बोर्डावरुन हटवलं अन्.. रेमंड ग्रुपमध्ये मोठा बदल, गौतम सिंघानियांच्या पत्नीचा मोठा निर्णय

gautam singhanias wife nawaz modi : नवाज मोदी सिंघानिया यांनी वैयक्तिक कारणांमुळे रेमंड लिमिटेडच्या बोर्ड सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांनी ३ कंपन्यांच्या बोर्डावरुन हटवण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:53 IST2025-03-20T11:53:01+5:302025-03-20T11:53:42+5:30

gautam singhanias wife nawaz modi : नवाज मोदी सिंघानिया यांनी वैयक्तिक कारणांमुळे रेमंड लिमिटेडच्या बोर्ड सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांनी ३ कंपन्यांच्या बोर्डावरुन हटवण्यात आले होते.

major reshuffle at raymond group gautam singhanias wife nawaz modi singhania resigns from board | आधी ३ कंपन्यांच्या बोर्डावरुन हटवलं अन्.. रेमंड ग्रुपमध्ये मोठा बदल, गौतम सिंघानियांच्या पत्नीचा मोठा निर्णय

आधी ३ कंपन्यांच्या बोर्डावरुन हटवलं अन्.. रेमंड ग्रुपमध्ये मोठा बदल, गौतम सिंघानियांच्या पत्नीचा मोठा निर्णय

gautam singhanias wife nawaz modi : क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. प्रसिद्ध रेमंड लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनात मोठा बदल झाला आहे. नवाज मोदी सिंघानिया यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला. नवाज या रेमंड लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांच्या पत्नी आहेत. मात्र, ३२ वर्ष सोबत संसार केल्यानंतर दोघांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला होता. नवाज आता कंपनीतूनही बाहेर पडल्या आहेत.

३२ वर्षानंतर काडीमोड
३२ वर्षांच्या नात्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना दोन मुले आहेत. वैयक्तिक कारणामुळे राजीनाम देत असल्याचे कारण नवाज यांनी सांगितले आहे. नवाज यांनी बोर्ड सदस्य म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल गौतम सिंघानिया यांनी त्यांचे आभार मानले. गेल्या वर्षी नवाज यांना रेमंडच्या ३ खासगी कंपन्यांच्या संचालक मंडळावरून हटवण्यात आले होते.

राजीनामा पत्रात नवाज यांनी काय लिहिलंय?
नवाज यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे की, 'वैयक्तिक कारणांमुळे मी रेमंड लिमिटेडच्या संचालकपदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. माझ्या संपूर्ण कार्यकाळात संचालक मंडळाने दिलेल्या प्रचंड सहकार्याबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. कृपया माझ्या राजीनाम्याचे पत्र स्वीकारावे आणि आवश्यक फॉर्म रजिस्ट्रार ऑफ कंपनीज आणि स्टॉक एक्स्चेंजच्या कार्यालयात जमा करण्याची व्यवस्था करा.'

गौतम सिंघानिया यांनी नवाज मोदी सिंघानिया यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, 'नवाज मोदी सिंघानिया यांनी बोर्ड सदस्य म्हणून केलेल्या सेवांबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

गेल्या वर्षी रेमंडच्या ३ कंपन्यांमधून नवाज यांना हटवण्यात आले
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये नवाज यांना रेमंडच्या जेके इन्व्हेस्टर्स (जेकेआय), रेमंड कंझ्युमर केअर (आरसीसीएल) आणि स्मार्ट ॲडव्हायझरी अँड फिनसर्व्ह या ३ खासगी कंपन्यांच्या बोर्डातून हटवण्यात आले होते. ३१ मार्च २०२४ रोजी झालेल्या असाधारण सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. संचालक मंडळाच्या निर्णयाला नवाज यांनी विरोध केला होता. मात्र, तरीही मंडळाने निर्णय बदलला नाही.

Web Title: major reshuffle at raymond group gautam singhanias wife nawaz modi singhania resigns from board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.