Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रवासी वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र, तर दुचाकी विक्रीत यूपी आघाडीवर

प्रवासी वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र, तर दुचाकी विक्रीत यूपी आघाडीवर

वाहन उत्पादकांचे संघटन सियामने ही माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 09:43 IST2025-05-24T09:43:30+5:302025-05-24T09:43:30+5:30

वाहन उत्पादकांचे संघटन सियामने ही माहिती दिली आहे.

maharashtra leads in passenger vehicle sales while uttar pradesh leads in two wheeler sales | प्रवासी वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र, तर दुचाकी विक्रीत यूपी आघाडीवर

प्रवासी वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र, तर दुचाकी विक्रीत यूपी आघाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्रात प्रवासी वाहनांची जोरदार विक्री सुरू असून, वित्त वर्ष २०२४-२५ मध्ये देशभरात विकलेल्या गेलेल्या प्रवासी वाहनांमध्ये सर्वाधिक प्रवासी गाड्या महाराष्ट्रात विकल्या गेल्या आहेत. तर दुचाकी वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेशने अव्वल नंबर पटकावला आहे. वाहन उत्पादकांचे संघटन सियामने ही माहिती दिली आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स च्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात ५,०६,२५४ युनिट्स इतकी प्रवासी वाहनांची विक्री झाली. देशातील विक्रीच्या तुलनेत हे प्रमाण ११.८% आहे. 

प्रवासी वाहने 

राज्य       युनिट्स      देशाच्या तुलनेत
महाराष्ट्र    ५,०६,२५४          ११.८%
उत्तर प्रदेश    ४,५५,५३०         १०.६%
गुजरात    ३,५४,०५४     ८.२%
कर्नाटक    ३,०९,४६४         ७.२%
हरयाणा    २,९४,३३१     ६.८%

दुचाकी वाहने 

उत्तर प्रदेश    २८,४३,४१०     १४.५%
महाराष्ट्र    २०,९१,२५०     १०.७%
तामिळनाडू    १४,८१,५११     ७.६%
कर्नाटक    १२,९४,५८२     ६.६%
गुजरात    १२,९०,५८८     ६.६%

 

Web Title: maharashtra leads in passenger vehicle sales while uttar pradesh leads in two wheeler sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.