नवी दिल्ली : महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत असून याचा फायदा विमान कंपन्या घेत आहेत. प्रयागराजला जाणाऱ्या विमान तिकिटांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात वाढले असून, विमान भाडेही अनेक पटींनी वाढले आहे. दिल्ली ते प्रयागराज या विमानांच्या तिकिटांच्या किमती २१ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
इक्सिगोच्या अहवालानुसार, लखनौ आणि वाराणसी या प्रयागराजजवळील शहरांचे हवाई भाडे तीन ते २१ टक्क्यांनी वाढले आहे. प्रयागराजसाठी विमान तिकीट बुकिंगमध्ये १६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर लखनौ आणि वाराणसीसाठी बुकिंग अनुक्रमे ४२% आणि १२७ टक्क्यांनी वाढले आहे. हे आकडे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीतील आहेत.
प्रयागराजसाठी किती भाडेवाढ (%)
भोपाळहून १७,७९६ ४९८%
बंगळुरूहून ११,१५८ ८९%
अहमदाबादहून १०,३६४ ४१%
दिल्लीहून ५,७८४ २१%
मुंबईहून ६,३८१ १३%
‘स्नान’ आणखी महाग
२० हून अधिक ठिकाणांहून थेट प्रयागराजला येत आहे. महत्त्वाच्या ‘स्नान’ तारखांच्या आधीच्या प्रवासाचे भाडेही वाढत आहे.
उदाहरणार्थ, २७ जानेवारी
रोजी, मुंबईसारख्या प्रमुख महानगरांमधून थेट उड्डाणांचे भाडे २७ हजार रुपये आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंगही वाढले आहे. त्याचा भाविकांना फटका बसत आहे.