Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू

तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू

Aadhaar LPG Link: जर तुमचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही एलपीजी गॅस सिलिंडर अनुदानासाठी पात्र आहात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 13:17 IST2025-09-14T12:54:02+5:302025-09-14T13:17:13+5:30

Aadhaar LPG Link: जर तुमचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही एलपीजी गॅस सिलिंडर अनुदानासाठी पात्र आहात.

LPG Subsidy Not Credited? Link Aadhaar to Your Gas Connection to Fix It | तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू

तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू

Aadhaar LPG Link : एलपीजी गॅस सिलेंडरच्या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड लिंक करणे आता अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. अनेकदा ग्राहकांना अचानक सबसिडी मिळणे बंद झाल्याचा अनुभव येतो. यामागे अनेक कारणे असू शकतात, परंतु सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आधार कार्ड गॅस कनेक्शनला लिंक नसणे. या समस्येवर उपाय म्हणून, सरकारने एक सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या तुमचे LPG कनेक्शन आधारशी जोडू शकता आणि सबसिडीचा लाभ पुन्हा सुरू करू शकता.

अनेकदा असे दिसून येते की, लोक गॅस सिलेंडर बुक करतात, पैसे भरतात आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यात सबसिडीची रक्कम जमा होते. मात्र, काही वेळा अचानक ही सबसिडी मिळणे बंद होते. त्यामुळे सबसिडी का बंद झाली, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे.

LPG सबसिडी म्हणजे काय?
सरकार पात्र ग्राहकांना आधारशी जोडलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट सबसिडीची रक्कम पाठवते. या सबसिडीची रक्कम आंतरराष्ट्रीय इंधनाचे दर आणि सरकारी नियमांनुसार बदलते. त्यामुळे, कधी ही रक्कम ७९ रुपये, तर कधी ३०० रुपयांपेक्षा जास्त असू शकते, किंवा कधीकधी सबसिडी मिळतही नाही. ही सबसिडी फक्त अशाच लोकांना मिळते, ज्यांचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

घरबसल्या LPG कनेक्शनला आधारशी असे करा लिंक
ऑनलाइन पद्धत

  • सर्वात आधी uidai.gov.in/seeding/User/ResidentSelfSeedingpds.aspx या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • 'बेनिफिट टाइप' मध्ये 'LPG' निवडा आणि तुमची गॅस कंपनी (उदा. इंडेन, भारत गॅस किंवा एचपी गॅस) निवडा.
  • आता तुमचा वितरक (डिस्ट्रीब्यूटर) आणि ग्राहक क्रमांक (कंझ्युमर नंबर) भरा.
  • त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि आधार नंबर टाकून 'सबमिट' वर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी येईल, तो टाकल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.
  • व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर तुम्हाला ईमेल किंवा मोबाइलवर एक कन्फर्मेशन मेसेज मिळेल.

वाचा - शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

ऑफलाइन पद्धत
जर तुम्हाला ऑनलाइन प्रक्रियेत कोणतीही अडचण येत असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या एलपीजी वितरकाच्या कार्यालयात जाऊनही हे काम करू शकता. तिथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डची एक प्रत आणि गॅस कनेक्शनची माहिती द्यावी लागेल. या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या एलपीजी कनेक्शनला आधारशी जोडून सरकारी सबसिडीचा लाभ घेऊ शकता.
 

Web Title: LPG Subsidy Not Credited? Link Aadhaar to Your Gas Connection to Fix It

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.