LPG Price Today: युद्धाच्या परिस्थितीमुळे भारताला एलपीजी (LPG) आयात करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारत आपला ६० टक्के एलपीजी आखाती देशांतून मागवतो, परंतु युद्धामुळे हा मार्ग प्रभावित झाला आहे. या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलेंडरच्या किमतीत काय बदल झाले आहेत आणि तुमच्या शहरातील दर काय आहेत, ते जाणून घेऊया.
घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर (१४.२ किलो)
या महिन्यात सुरुवातीला घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आजपर्यंत किमतीत कोणताही बदल झालेला नाही. शहरांनुसार दर खालीलप्रमाणे आहेत:
नवी दिल्ली: ९१३ रुपये
मुंबई: ९१२.५० रुपये
कोलकाता: ९३९ रुपये
चेन्नई: ९२८.५० रुपये
हैदराबाद: ९६५ रुपये
कॉमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर
कॉमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत या महिन्याच्या सुरुवातीला १४४ रुपयांची वाढ झाली होती. सध्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:
दिल्ली: १८८४.५० रुपये
मुंबई: १८३६ रुपये
कोलकाता: १९८८.५० रुपये
चेन्नई: २०४३.५० रुपये
हैदराबाद: २००७ रुपये
बंगळुरू: १९५८ रुपये
देशाकडे ६० दिवसांचा साठा; घाबरण्याचं कारण नाही
केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय की, त्यांच्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा ६० दिवसांचा साठा उपलब्ध आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची कोणतीही कमतरता नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सरकारनं तेल कंपन्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच, राज्यांचा कोटा २० टक्क्यांवरून वाढवून ५० टक्के करण्यात आला असून सरकार पुरवठ्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहे.
पॅनिक बुकिंगमध्ये घट
गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच्या 'पॅनिक बुकिंग'मध्ये घट झाली आहे. परिणामी, आता गॅस एजन्सीबाहेर होणारी गर्दी कमी झाली आहे.
