LPG Cylinder Price Cut: जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच (July 2025) एलपीजी युजर्सना दिलासा मिळाला आहे. खरंतर, ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करत भेट दिली आहे आणि दिल्ली ते मुंबईपर्यंत याची किंमत स्वस्त झालीये. एलपीजी सिलिंडरच्या सुधारित किमती आज, १ जुलै २०२५ पासून लागू झाल्या आहेत. यावेळीही इंधन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत आणि राजधानी दिल्लीत (LPG Cylinder Price In Delhi) तो ५८ रुपयांनी स्वस्त झालाय. तर १४ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
काय आहेत नव्या किंमती?
आयओसीएलच्या वेबसाइटनुसार, १ जुलैपासून लागू झालेल्या दुरुस्तीनंतर, दिल्लीत १७२३.५० रुपयांना उपलब्ध असलेला व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता १६६५ रुपयांना मिळेल. त्याच वेळी, कोलकातामध्ये, १९ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत (Kolkata LPG Cylinder Price) १ जुलैपासून १८२६ रुपयांवरून १७६९ रुपयांवर आली आहे. तर मुंबईत (Mumbai LPG Price) एलपीजी सिलिंडरची किंमत १६७४.५० रुपयांवरून १६१६.५० रुपयांवर आली आहे, तर चेन्नईमध्ये १८८१ रुपयांना उपलब्ध असलेला सिलिंडर आता १८२३.५० रुपयांना मिळेल.
जूनमध्ये किंमतीत कपात
जूनच्या मागील महिन्यातही कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या आणि १ जून २०२५ पासून हा सिलिंडर २४ रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता. या कपातीनंतर, दिल्लीमध्ये कमर्शियल एलपीजी सिलिंडर (LPG Price In Delhi) १७२३.५० रुपयांवर आला होता, जो १७४७.५० रुपयांना उपलब्ध होता. याशिवाय, कोलकातामध्ये तो १८२६ रुपये, मुंबईत १६७४.५० रुपये (LPG Cylinder Price In Mumbai) आणि चेन्नईमध्ये १८८१ रुपयांवर आला होता.
इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात आणि कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती, भारतीय चलन रुपयाची स्थिती तसेच इतर बाजार परिस्थिती लक्षात घेऊन त्यांचे दर सुधारित करतात. १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली ही कपात विशेषतः हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि इतर व्यावसायिक संस्थांसाठी दिलासा देणारी आहे, जे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरतात. सध्या कमर्शिअल एलपीजीच्या दरात बदल करण्यात आला असून घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.