Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या

नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या

कोणतीही आर्थिक आणीबाणी सांगून येत नाही. त्यासाठी तयार असणं आवश्यक आहे. परंतु नोकरी गेली असेल किंवा वैद्यकीय आणीबाणी अशा परिस्थिती लोन मोरेटोरियम हा तुम्हाला काही काळासाठी दिलासा देणारा पर्याय ठरू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:51 IST2025-08-08T15:50:48+5:302025-08-08T15:51:33+5:30

कोणतीही आर्थिक आणीबाणी सांगून येत नाही. त्यासाठी तयार असणं आवश्यक आहे. परंतु नोकरी गेली असेल किंवा वैद्यकीय आणीबाणी अशा परिस्थिती लोन मोरेटोरियम हा तुम्हाला काही काळासाठी दिलासा देणारा पर्याय ठरू शकतो.

Lost job but loan installments emi remain the same loan moratorium might be a good option for you know details | नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या

नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या

कोणतीही आर्थिक आणीबाणी सांगून येत नाही. त्यासाठी तयार असणं आवश्यक आहे. परंतु नोकरी गेली असेल किंवा वैद्यकीय आणीबाणी अशा परिस्थिती लोन मोरेटोरियम हा तुम्हाला काही काळासाठी दिलासा देणारा पर्याय ठरू शकतो. तुम्ही या पर्यायाचा वापर करुन तुमचा ईएमआय मात्र काही काळासाठी थांबवू शकता. हा पर्याय तुम्हाला काही काळासाठी दिलासा देऊ शकतो, परंतु कर्जातून पूर्णपणे मुक्त करू शकत नाही.

लोन मोरेटोरियम म्हणजे काय?

लोन मोरेटोरियम ही कर्जमुक्त होण्याची संधी नाही, तर काही काळासाठी पॉझ घेण्याच्या बटणाप्रमाणे आहे. बँका कर्जदारांना अनपेक्षित अडचणींमुळे EMI थांबवण्याची परवानगी देऊ शकतात. परंतु व्याज थांबत नाही. ते सुरूच राहतं आणि तुमच्या कर्जात वाढ करत जातं.

काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

कर्जमाफी नाही, फक्त काही काळासाठी दिलासा

मोरेटोरियम म्हणजे तुमची थकबाकी माफ केली जात नाहीये, ती फक्त पुढे ढकलली जात आहेत. ही सवलत तुम्हाला काही काळासाठी सवलत देऊ शकते, परंतु कर्ज बंद करत नाही. कर्जाचा कालावधी जास्त असेल किंवा नंतर तुमच्या ईएमआयमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे. काहींसाठी, याचा अर्थ भविष्यात मोठा आर्थिक भार पडेल.

कोण अर्ज करू शकतं?

सर्वसाधारणपणे मोरेटोरियम आपोआप दिलं जात नाहीत. यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि आवश्यक ती दस्तऐवज, रुग्णालयाचं बिल, नोकरीचा संपवण्याचा पत्र, किंवा पगाराच्या पावत्या यांसारख्या कागदपत्रांसह त्याची कारणे स्पष्ट करावी लागतील. तुमचा खातं चांगल्या स्थितीत असावं (सामान्यतः ९० दिवसांपेक्षा जास्त उशीर न झालेला) आणि मंजुरीही प्रकरणानुसार दिली जाईल.

ईएमआय कसे थांबवाल?

  • तुमच्या कर्जदात्याशी बोला - तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल प्रामाणिक राहा.
  • संबंधित कागदपत्रे सादर करा - यामध्ये नोकरी गमावणं, आजारपण इत्यादींचा पुरावा द्या.
  • अटी समजून घ्या - व्याज वाढेल का आणि ते तुमच्या मुदतीवर किंवा ईएमआयवर कसा परिणाम करते ते विचारा.
  • हुशारीनं वाटाघाटी करा - तुम्ही कर्जाची मुदत वाढवू शकता किंवा ईएमआय कमी करू शकता.
  • क्रेडिट स्कोअरवरील परिणाम जाणून घ्या - सर्व मोरेटोरियम क्रेडिट स्कोअरवर समान परिणाम करत नाहीत.
  • मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला सुधारित परतफेडीची तपशील आणि नवीन ईएमआयची माहिती मिळेल.
     

लोन मोरेटोरियमचे फायदे

  • कठीण काळात ईएमआयपासून दिलासा मिळतो
  • लेट पेनल्टी किंवा डिफॉल्टर म्हणून नाव येत नाही.
  • नोकरी गमावणे, आजारपण किंवा उत्पन्नात कपात यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त
     

लोन मोरेटोरियमचे तोटे

  • व्याज वाढतच राहतं
  • कर्जाची मुदत वाढणं किंवा वाढलेले ईएमआय
  • मोठ्या कर्जांसाठी (उदा. गृहकर्ज), यासाठी कालावधी लांबू शकतो
  • क्रेडिट कार्ड मर्यादा मर्यादित होऊ शकतात
     

याचा फायदा घ्यावा का?

जर तुम्हाला खरोखर गरज असेल तरच या पर्यायाचा विचार का. जर तुम्ही ईएमआय भरणं सुरू ठेवू शकत असाल तर ते करा, ते तुम्हाच्या वाढत्या व्याजापासून बचाव करेल. गृहकर्ज भरणाऱ्यांसाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुमचा बहुतेक ईएमआय व्याजातच जातो. हे मध्येच थांबवल्यानं नंतर खूप जास्त खर्च येऊ शकतो. मोरेटोरियम हे कर्ज थांबवण्याचा पर्याय बिलकूल नाही. तुमच्या बँकेशी बोला, आकडे तपासा आणि माहितीपूर्ण निर्णय घ्या.

Web Title: Lost job but loan installments emi remain the same loan moratorium might be a good option for you know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.