LIC Bima Lakshmi scheme : भारतीय महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारतीय जीवन विमा निगमने एक विशेष भेट दिली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच झालेली 'एलआयसी बीमा लक्ष्मी' ही योजना महिलांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. सुरक्षित बचत, जोखीममुक्त विमा संरक्षण आणि 'मनी बॅक'चा फायदा देणारी ही योजना महिलांच्या भविष्यासाठी एक भक्कम आधार ठरत आहे.
काय आहे 'बीमा लक्ष्मी' योजना?
ही एक नॉन-लिंक्ड, वैयक्तिक आणि 'मनी बॅक' लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे. यामध्ये केवळ बचतच होत नाही, तर ठराविक कालावधीनंतर परतावा आणि मुदत संपल्यानंतर मोठी रक्कम मिळते. या योजनेत १८ ते ५० वर्षे वयोगटातील कोणतीही भारतीय महिला यात गुंतवणूक करू शकते. अल्पवयीन मुलींच्या नावे त्यांचे पालक ही पॉलिसी घेऊ शकतात. पॉलिसीचा एकूण कालावधी २५ वर्षांचा असतो. गुंतवणूकदार ७ ते १५ वर्षांपर्यंत प्रीमियम भरण्याचा पर्याय निवडू शकतात.
योजनेची खास वैशिष्ट्ये
- दरवर्षी विम्याच्या रकमेवर ७% बोनस जोडला जातो, ज्यामुळे मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळते.
- दर २ किंवा ४ वर्षांनी ठराविक रक्कम 'सर्व्हायव्हल बेनिफिट' म्हणून दिली जाते.
- ३ वर्षे प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसीवर कर्ज घेता येते.
- आयकर कलम ८० सी अंतर्गत प्रीमियमवर आणि १०(१०डी) अंतर्गत मॅच्युरिटीच्या रकमेवर कर सवलत मिळते.
- यामध्ये गंभीर आजारांसाठी अतिरिक्त कव्हर घेण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
४,४५० रुपयांत १६ लाखांचा फंड!
- समजा एखादी ४० वर्षे वयाची महिला १५ वर्षांच्या प्रीमियम कालावधीसाठी ही योजना घेते.
- मासिक बचत : सुमारे ४,४५० रुपये (वार्षिक ५३,४०० रुपये)
- प्रीमियम भरण्याचा काळ : १५ वर्षे
- एकूण जमा प्रीमियम : सुमारे ८,०७,०७५ रुपये
वाचा - SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
मिळणारे फायदे (२५ वर्षांनंतर)
- दर २ वर्षांनी मिळणारे अंदाजे २२,५०० रुपये (असे एकूण टप्पे मिळून २.७० लाख).
- मॅच्युरिटी मिळणारी रक्कम सुमारे १३,०९,२६० रुपये.
- एकूण नफा १५,७९,२६० रुपये (अंदाजे १६ लाख).
