Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं

Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं

Lenskar IPO Listing Date: आयवेअर कंपनी लेन्सकार्ट सोल्युशन्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आणि तो २८.२६ पट भरला गेला. कंपनीला एकूण ३२.५६ लाखांहून अधिक अर्ज मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:13 IST2025-11-06T11:12:12+5:302025-11-06T11:13:11+5:30

Lenskar IPO Listing Date: आयवेअर कंपनी लेन्सकार्ट सोल्युशन्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आणि तो २८.२६ पट भरला गेला. कंपनीला एकूण ३२.५६ लाखांहून अधिक अर्ज मिळाले.

Lenskart IPO Will there be listing gain when will the share allotment take place Know the answers to all your questions | Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं

Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं

Lenskar IPO: आयवेअर कंपनी लेन्सकार्ट सोल्युशन्सच्या (Lenskart Solutions) आयपीओला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आणि तो २८.२६ पट भरला गेला. कंपनीला एकूण ३२.५६ लाखांहून अधिक अर्ज मिळाले, ज्यामुळे या बोलींचे एकूण मूल्य सुमारे १.१३ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं.

सबस्क्रिप्शन तपशील

सर्वाधिक बोली क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सनी (QIBs) लावली आणि त्यांच्यासाठी आरक्षित असलेला हिस्सा ४०.३५ पट सबस्क्राइब झाला.

किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांचा हिस्सा ७.५४ पट भरला.

आयपीओ ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता.

आयपीओचा प्राइस बँड ₹३८२ ते ₹४०२ प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.

हा आयपीओ २,१५० कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू आणि ५,१२८ कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल (OFS) यांचे मिश्रण होता. या माध्यमातून कंपनीनं एकूण ७,२७८ कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला होता.

शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्समध्ये २८० अंकांची तेजी; Reliance, SBI, Asian Paint वधारले

गुंतवणूकदारांची चिंता आणि जीएमपी (GMP)

बोली लावण्याची प्रक्रिया संपल्यानंतर आता सर्वांचं लक्ष शेअर वाटपावर लागलं आहे. दरम्यान, आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्यांना शेअर्सच्या घसरलेल्या ग्रे मार्केट प्रीमियमने (GMP) चिंतेत टाकलंय. लेन्सकार्ट आयपीओचा जीएमपी आता घसरून निम्मा झाला आहे.

सध्याचा जीएमपी: ग्रे मार्केटवर लक्ष ठेवणाऱ्या वेबसाइटनुसार, गुरुवारी लेन्सकार्ट आयपीओचा जीएमपी ३९ रुपये सुरू होता.

संभाव्य लिस्टिंग किंमत: ग्रे मार्केटनुसार, लेन्सकार्टचे शेअर्स ४४१ रुपयांवर लिस्ट होऊ शकतात. याचा अर्थ आयपीओ गुंतवणूकदारांना ९ टक्के लिस्टिंग गेन (Listing Gain) मिळू शकतो.

ब्रोकरेजची मतं: ब्रोकरेज फर्म्सची लेन्सकार्टच्या आयपीओबद्दल संमिश्र मतं आहेत.

वाटप आणि लिस्टिंगची तारीख

शेअर्सचे वाटप: लेन्सकार्ट आयपीओचं वाटप आज म्हणजेच ६ नोव्हेंबर २०२५ रोजी निश्चित होण्याची शक्यता आहे.

रिफंड आणि क्रेडिट: ज्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप झाले आहे, त्यांच्या डीमॅट खात्यात कंपनी शेअर्स जमा करेल. ज्यांना शेअर्स मिळाले नाहीत, त्यांचा रिफंड ७ नोव्हेंबरपासून सुरू होईल.

लिस्टिंग: कंपनीचे शेअर्स सोमवार, १० नोव्हेंबर रोजी बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) वर लिस्ट होतील.

स्टेटस तपासणी: गुंतवणूकदार बीएसई (BSE), एनएसई (NSE) आणि आयपीओ रजिस्ट्रार MUFG Intime India च्या वेबसाइटवर जाऊन अलॉटमेंट स्टेटस तपासू शकतात. स्टेटस चेक करण्यासाठी पॅन कार्ड क्रमांक आणि ॲप्लिकेशन क्रमांक एन्टर करावा लागेल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : Lenskart IPO: अलॉटमेंट, लिस्टिंग गेन के बारे में सब कुछ जानिए।

Web Summary : Lenskart IPO को भरपूर सब्सक्रिप्शन मिला। अलॉटमेंट 6 नवंबर, 2025 को होने की संभावना है। GMP से 9% लिस्टिंग लाभ की संभावना है। निवेशक ऑनलाइन स्टेटस चेक कर सकते हैं।

Web Title : Lenskart IPO: All you need to know about allotment, listing gains.

Web Summary : Lenskart IPO oversubscribed. Allotment likely November 6, 2025. GMP indicates potential 9% listing gains. Investors can check status online.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.