Aadhaar Card Update: जर तुम्ही अद्याप तुमच्या आधार कार्डची माहिती अपडेट केली नसेल तर तुम्हाला ती मोफत अपडेट करण्याची सुवर्णसंधी आहे. यूआयडीएआय (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) आधारमधील माहिती मोफत अपडेट करण्याची संधी देत आहे. माय आधार पोर्टलवर युजर्स आधारची माहिती ऑनलाइन अपडेट करू शकतात. युजर्स १४ जून २०२५ पर्यंत यूआयडीएआयच्या मोफत सेवेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच युजर्सकडे फ्री अपडेट करण्यासाठी जवळपास १२२ दिवस शिल्लक आहेत. मोफत पत्ता अद्ययावत करण्याची मुदत यूआयडीएआयनं यापूर्वी अनेकदा वाढवली आहे. परंतु आता आधारमध्ये मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ जून आहे.
या मोफत सेवेअंतर्गत तुम्ही तुमचा ओळखीचा पुरावा (ओळखीचा पुरावा) आणि पत्त्याचा पुरावा (पीओए) ऑनलाइन अपडेट करू शकता. मात्र, १५ जून २०२५ नंतर प्रत्यक्ष आधार केंद्रावर जाऊन माहिती अपडेट केल्यास ५० रुपये शुल्क आकारलं जाईल, जे सध्याच्या ऑफलाइन शुल्काइतकं आहे.
UIDAI नं काय म्हटलं?
UIDAI ने विशेषतः अशा लोकांना त्यांचं आधार अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे ज्यांचं आधार १० वर्षे किंवा त्याहून अधिक जुनं आहे आणि आतापर्यंत कधीही अपडेट केलेलं नाही. यामुळे रेकॉर्डमधील माहिती बरोबर राहते याची खात्री होते. आधार वापरून कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण येत नाही.
ऑनलाइन कसं अपडेट कराल?
- myAadhaar पोर्टल (https://myaadhaar.uidai.gov.in) वर जा.
- आधार नंबर आणि OTP द्वारे लॉग इन करा.
- वैध PoI आणि PoA कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.
- रिक्वेस्ट सबमिट करा आणि Update Request Number (URN) लिहून ठेवा.
जर तुम्हाला पत्ता बदलायचा असेल तर?
- आधार पोर्टलवर लॉग इन करा.
- नवा पत्ता एन्टर करा आणि त्याचं प्रूफ अपलोड करा.
- सबमिट करून युआरएन घ्या.
- रिक्वेस्ट मंजूर झाल्यानंतर तुम्ही तुमचं अपडेटेड आधार डाऊनलोड करू शकता.