Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात केल्यानंतर अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी गृहकर्ज स्वस्त करण्यास सुरुवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:18 IST2025-06-14T16:17:08+5:302025-06-14T16:18:17+5:30

रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात केल्यानंतर अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी गृहकर्ज स्वस्त करण्यास सुरुवात केली आहे.

largest govt bank sbi largest gave a gift to customers reduced loan interest rates quickly see the latest rates | देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात केल्यानंतर अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी गृहकर्ज स्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. आता भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानंही गृहकर्जाच्या व्याजदरात ०.५० टक्क्यांची कपात केलीये. एसबीआयनं आपल्या कर्जाच्या दरात जे बदल केले आहेत, ते उद्यापासून म्हणजेच १५ जून २०२५ पासून लागू होतील. या कपातीनंतर एसबीआयकडून सर्व प्रकारची कर्ज घेणं स्वस्त होणार आहे. आता एसबीआयचे गृहकर्जाचे व्याजदर वार्षिक ७.५० टक्क्यांपासून सुरू होतील. होम लोन मॅक्सगेन ओव्हरड्राफ्ट (मॅक्सगेन ओडी) वरील व्याजदर ७.७५% ते ८.७०% दरम्यान असेल. तर टॉप-अप गृहकर्जावरील व्याजदर ८% ते १०.५०% दरम्यान निश्चित करण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेने नुकताच रेपो दर ६.०० टक्क्यांवरून ५.५० टक्क्यांवर आणला आहे. यानंतर बँकांनीही एफडी आणि कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनी कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. या व्याजदर कपातीचा फायदा त्या सर्वांना होणारे ज्यांची कर्ज रेपो लिंक्ड लेंडिंग रेटशी (आरएलएलआर) जोडलेली आहेत. एसबीआयगृहकर्ज एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटशी (ईबीएलआर) शी जोडलेलं आणि सध्याचा ईबीएलआर ८.१५% आहे. वेगवेगळ्या व्यक्तींसाठी व्याजदर त्यांच्या सिबिल स्कोअर, कर्जाचा कालावधी आणि इतर घटकांवर अवलंबून असून तो बदलू शकतो.

युद्धाच्या भडक्याने पेट्रोल महागणार? कच्च्या तेलाच्या दरात १० टक्क्यांनी वाढ; शेअर बाजाराने गुंतवणूकदारांच्या हातात दिला भोपळा

नव्या कर्जदारांना फायदा होणार?

होय, या कपातीचा फायदा एसबीआयकडून नवीन गृहकर्ज घेणाऱ्यांनाही होणार आहे. उदाहरणार्थ, एसबीआय नवीन गृहकर्जाचा व्याजदर पूर्वी ८% वरून सुरू होत होता, आता तो ७.५०% पर्यंत खाली येईल. ज्या ग्राहकांनी आरएलएलआरशी जोडलेले फ्लोटिंग रेट होम लोन घेतले आहे, त्यांचे व्याजदर ही कमी होतील. यामुळे एकतर त्यांचा ईएमआय कमी होईल किंवा कर्जाचा कालावधी कमी होईल. होय, जर कर्ज फिक्स्ड रेटशी जोडले गेले तर तुम्हाला एसबीआयच्या व्याजकपातीचा फायदा मिळणार नाही.

एसबीआयने स्पष्ट केले आहे की १४ जून २०२५ पर्यंत मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच एमसीएलआर चे दर कायम आहेत. ओव्हरनाईट आणि एका महिन्याचा एमसीएलआर दर ८.२०%, तीन महिन्यांचा एमसीएलआर ८.५५% आणि सहा महिन्यांचा एमसीएलआर दर ८.९०% आहे. एक वर्षाचा एमसीएलआर ९.००% आहे.

Web Title: largest govt bank sbi largest gave a gift to customers reduced loan interest rates quickly see the latest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.