Lokmat Money > बिझनेस न्यूज > Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

Karur Vysya Bank Ltd Bonus Share: बँकेनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटलंय की २४ जुलै रोजी बोर्डाची बैठक पार पडणार आहे. बोनस शेअर्सबाबतचा निर्णय याच बैठकीत घेतला जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:36 IST2025-07-19T15:35:49+5:302025-07-19T15:36:22+5:30

Karur Vysya Bank Ltd Bonus Share: बँकेनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटलंय की २४ जुलै रोजी बोर्डाची बैठक पार पडणार आहे. बोनस शेअर्सबाबतचा निर्णय याच बैठकीत घेतला जाईल.

Karur Vysya Bank Ltd will issue bonus shares for the fourth time decision will be made before July 25 do you have stock | Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

Karur Vysya Bank Ltd Bonus Share: तामिळनाडू स्थित करूर वैश्य बँक (Karur Vysya Bank Ltd) पुन्हा एकदा बोनस शेअर्स देण्याची शक्यता आहे. बँकेनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटलंय की २४ जुलै रोजी बोर्डाची बैठक पार पडणार आहे. बोनस शेअर्सबाबतचा निर्णय याच बैठकीत घेतला जाईल. जर कंपनीच्या बोर्डानं बोनस शेअर्स देण्यास सहमती दर्शवली तर गुंतवणूकदारांना ७ वर्षांत प्रथमच बोनस शेअर्स मिळतील. २४ जुलै रोजी करूर वैश्य बँकेकडून तिमाही निकाल देखील जाहीर केले जातील.

यापूर्वी ३ वेळा दिलेत बोनस शेअर्स

करूर वैश्य बँकेनं यापूर्वी गुंतवणूकदारांना ३ वेळा बोनस शेअर्स दिलेत. बँकेनं २००२ मध्ये गुंतवणूकदारांना पहिल्यांदा बोनस शेअर्स दिले. त्यानंतर बँकेकडून एका शेअरवर एक शेअर बोनस दिला. २०१० मध्ये, बँकेनं दुसऱ्यांदा गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले. त्यानंतर पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक ५ शेअर्समागे २ शेअर्सचा बोनस देण्यात आला. करूर वैश्य बँकेनं २०१८ मध्ये गुंतवणूकदारांना शेवटचे बोनस शेअर्स दिले होते. त्यानंतर, पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक १० शेअर्समागे एक शेअर बोनस मिळाला.

किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'

शेअर बाजारात कामगिरी कशी आहे?

शुक्रवारी, बीएसई वर करूर वैश्य बँकेचे शेअर्स ०.८१ टक्क्यांनी घसरून २६८.१५ रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात बँकेच्या शेअर्सची किंमत ८ टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, ६ महिन्यांत या बँकेनं शेअर बाजारातील पोझिशनल गुंतवणूकदारांना २२ टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय.

गेल्या एका वर्षात, करूर वैश्य बँकेनं त्यांच्या पोझिशनल गुंतवणूकदारांना २९ टक्के परतावा दिला. या बँकिंग स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २७७.५५ रुपये आहे आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १८४.४० रुपये आहे. बँकेचं मार्केट कॅप २१४५५ कोटी रुपये आहे. करूर वैश्य बँकेनं २०२४ मध्ये गुंतवणूकदारांना शेवटचा लाभांश दिला होता. तेव्हा बँकेने प्रति शेअर २.४० रुपये लाभांश दिला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Karur Vysya Bank Ltd will issue bonus shares for the fourth time decision will be made before July 25 do you have stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.