Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोट्यवधींची संपत्ती, वडील केंद्रीय मंत्री, तरीही विकतोय भाजीपाला, सिंधियांच्या मुलाची खरी स्टोरी काय?

कोट्यवधींची संपत्ती, वडील केंद्रीय मंत्री, तरीही विकतोय भाजीपाला, सिंधियांच्या मुलाची खरी स्टोरी काय?

jyotiraditya scindias son : ग्वाल्हेर राजघराण्याचे वारस ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुलगा महाआर्यमन यांनी स्वतःच्या हिमतीवर नवीन व्यवसाय उभा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:11 IST2025-04-04T14:42:30+5:302025-04-04T15:11:20+5:30

jyotiraditya scindias son : ग्वाल्हेर राजघराण्याचे वारस ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुलगा महाआर्यमन यांनी स्वतःच्या हिमतीवर नवीन व्यवसाय उभा केला आहे.

jyotiraditya scindias son builds startup multi crore vegetable selling company ratan tata invests mymandi | कोट्यवधींची संपत्ती, वडील केंद्रीय मंत्री, तरीही विकतोय भाजीपाला, सिंधियांच्या मुलाची खरी स्टोरी काय?

कोट्यवधींची संपत्ती, वडील केंद्रीय मंत्री, तरीही विकतोय भाजीपाला, सिंधियांच्या मुलाची खरी स्टोरी काय?

jyotiraditya scindias son : कोट्यवधी रुपयांची संपत्ती, वडील केंद्रीय मंत्री असताना मुलांना काम करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. साधारणपणे श्रीमंत घरातील मुलं आईवडिलांनी कमावलेली संपत्ती उधळत असतात, अशीच आपली समज असते. मात्र, प्रत्येकवेळी हे विधान खरं ठरत नाही. कारण, काही मुलांना स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करुन दाखवण्याची इच्छा असतात. असेच एक उदाहरण समोर आलं आहे. हा तरुण साधासुधा नाही तर ग्वाल्हेरच्या राजघराण्यात जन्मलेला आहे. वडील केंद्रीय मंत्री असूनही मुलाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याऐवजी स्वतः भाजीपाला विकण्याचा व्यवसाय उभा केला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा हा मुलगा आहे.

महाआर्यमन यांचं नवीन व्यवसायात यश
ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुलगा महाआर्यमन यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोट्यवधींची संपत्ती असूनही महाआर्यमन सिंधिया भाजीविक्रेते म्हणून काम करत आहेत. महाआर्यमन यांनी एका मित्रासह २०२१ मध्ये MyMandi नावाचा स्टार्टअप सुरू केला. ते या MyMandi चे सह-संस्थापक आहेत. सुरुवातीच्या काळात महाआर्यमन स्वतः सकाळी लवकर बाजारात जायचे आणि ताजी फळे आणि भाजीपाला विकत घ्यायचे आणि त्यांच्या ॲपद्वारे लोकांपर्यंत पोचवायचे. मायमंडी ही ऑनलाइन एग्रीगेटर आहे, जी फळे आणि भाज्यांचा पुरवठा करते. प्रत्यक्षात भाजीपाला मोठ्या प्रमाणात खरेदी करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कंपनी करते. अनेक शेतकरी या स्टार्टअपशी जोडले गेले आहेत. सध्या हा बाजार पाच शहरांमध्ये आहे.

रतन टाटा यांचीही स्टार्टअपमध्ये गुंतवणूक
महाआर्यमन यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण दून स्कूलमधून केले. यानंतर त्यांनी गेल विद्यापीठातून पदवी घेतली. यासोबतच त्यांनी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि सॉफ्टबँक सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम केले आहे. मायमंडीने आतापर्यंत ३ फंडिंग फेऱ्या केल्या आहेत. कंपनीने सप्टेंबर २०२३ मध्ये १.२ मिलियन डॉलरचा निधी उभारला. कंपनीचे मूल्यांकन सुमारे १५० कोटी रुपये आहे. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनीही त्यांच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.

वाचा - ट्रम्प यांच्यासोबतची जवळीक इलॉन मस्कना महागात? टेस्ला कंपनीला बसला मोठा फटका

महाआर्यमन सिंधिया अलिशान पॅलेस 
ग्वाल्हेरमधील जयविलास महलमध्ये महाआर्यमन सिंधिया कुटुंबासोबत राहतात. त्यावेळी जयविलास पॅलेस बांधण्यासाठी १.१ कोटी रुपये खर्च आला होता, आज पाहिले तर या पॅलेसची किंमत सुमारे ४ हजार कोटी रुपये आहे. जयविलास पॅलेसचे शाही जेवण खूप प्रसिद्ध आहे. राजवाड्यात जेवण देण्यासाठी चांदीची सुंदर ट्रेन आहे. डायनिंग टेबलवर एक ट्रॅक आहे. सोन्या-चांदीची भांडी खाण्यासाठी वापरली जातात.

Web Title: jyotiraditya scindias son builds startup multi crore vegetable selling company ratan tata invests mymandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.