Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jumped Deposit Scam : बँक बॅलन्स पाहण्यासाठी पिन टाकाल, अकाऊंटमधून उडतील पैसे; आला नवा स्कॅम

Jumped Deposit Scam : बँक बॅलन्स पाहण्यासाठी पिन टाकाल, अकाऊंटमधून उडतील पैसे; आला नवा स्कॅम

Jumped Deposit Scam: गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फ्रॉडच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. सायबर गुन्हेगार सामान्य लोकांना लुटण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात. अशातच एक नवा स्कॅम बाजारात आलाय, ज्याचं नाव आहे, जंप्ड डिपॉझिट स्कॅम.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:12 IST2025-01-11T14:11:41+5:302025-01-11T14:12:18+5:30

Jumped Deposit Scam: गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फ्रॉडच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. सायबर गुन्हेगार सामान्य लोकांना लुटण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात. अशातच एक नवा स्कॅम बाजारात आलाय, ज्याचं नाव आहे, जंप्ड डिपॉझिट स्कॅम.

Jumped Deposit Scam if Enter PIN to check bank balance money will deducted from account upi scam alert | Jumped Deposit Scam : बँक बॅलन्स पाहण्यासाठी पिन टाकाल, अकाऊंटमधून उडतील पैसे; आला नवा स्कॅम

Jumped Deposit Scam : बँक बॅलन्स पाहण्यासाठी पिन टाकाल, अकाऊंटमधून उडतील पैसे; आला नवा स्कॅम

Jumped Deposit Scam: गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फ्रॉडच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. सायबर गुन्हेगार सामान्य लोकांना लुटण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात. अशातच एक नवा स्कॅम बाजारात आलाय, ज्याचं नाव आहे - जंप्ड डिपॉझिट स्कॅम. खरं तर हा एक नवा सायबर स्कॅम आहे जो युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरकर्त्यांना टार्गेट करत आहेत. या स्कॅममध्ये स्कॅमर्स लोकांनी न मागताच त्यांच्या अकाऊंटमध्ये एक छोटी रक्कम टाकून त्यांना फसवतात.

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कसा होतो हा स्कॅम?

या घोटाळ्यात सायबर गुन्हेगार प्रथम यूपीआयच्या माध्यमातून लोकांच्या बँक खात्यात थोडी रक्कम जमा करतात. त्यानंतर ते त्यांना मोठी रक्कम परत करण्याची विनंती करतात. खात्यात पैसे येत असल्याची माहिती मिळाल्यावर ते अनेकदा यूपीआय अॅप उघडून बॅलन्स तपासतात आणि पिन टाकतात. यावेळी या त्यांनी बनावट ट्रान्झॅक्शनची रिक्वेस्ट पाठवलेली असते. आपला पिन टाकताच ही रिक्वेस्ट मान्य केली जाते आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढले जातात.

तामिळनाडू पोलिसांनी लोकांना या घोटाळ्याबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर अशा फसवणुकीच्या तक्रारी सातत्यानं नोंदवल्या जात आहेत. अनोळखी व्यक्तीकडून पैसे मिळाल्यास तात्काळ खबरदारी घ्या, असं पोलिसांनी सांगितलंय.

हा घोटाळा कसा टाळता येईल?

बॅलन्स लगेच तपासू नका : तुमच्या खात्यात काही अनोळखी व्यक्तीकडून पैसे आल्यास काही वेळ थांबा. या दरम्यान कोणत्याही बनावट रिक्वेस्टची मुदत संपेल आणि स्कॅमर्सना तुमचा पिन वापरण्याची संधी मिळणार नाही.

चुकीचा पिन टाका : बॅलन्स ताबडतोब तपासणं आवश्यक असल्यास मुद्दाम चुकीचा पिन टाका. असं केल्यानं कोणतीही रिक्वेस्ट नाकारली जाईल आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतील.

सावध राहा : यूपीआय वापरताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून येणारे पैसे आणि त्यांच्या रिक्वेस्टबाबत सावधगिरी बाळगा. फसवणुकीचे व्यवहार टाळण्यासाठी नेहमी विचारपूर्वक काम करा आणि आपला पिन गोपनीय ठेवा. सायबर क्राईम पोर्टलवर अशा घटनांच्या तक्रारी तात्काळ नोंदवा.

Web Title: Jumped Deposit Scam if Enter PIN to check bank balance money will deducted from account upi scam alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.