Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jio नं आपल्या ग्राहकांना केलं खुश, TRAI च्या नियमानंतर आता केला 'हा' मोठा बदल

Jio नं आपल्या ग्राहकांना केलं खुश, TRAI च्या नियमानंतर आता केला 'हा' मोठा बदल

Reliance Jio Recharge Plans: रिलायन्स जिओ सातत्यानं आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्लान्स आणत असते. आता ट्रायच्या नियमानंतर जिओनं आपल्या ग्राहकांसाठी काही नवे प्लान्स आणले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:22 IST2025-01-23T10:22:21+5:302025-01-23T10:22:21+5:30

Reliance Jio Recharge Plans: रिलायन्स जिओ सातत्यानं आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्लान्स आणत असते. आता ट्रायच्या नियमानंतर जिओनं आपल्या ग्राहकांसाठी काही नवे प्लान्स आणले आहेत.

Jio has made its customers happy after TRAIs rules launched new prepaid plans with only data and voice | Jio नं आपल्या ग्राहकांना केलं खुश, TRAI च्या नियमानंतर आता केला 'हा' मोठा बदल

Jio नं आपल्या ग्राहकांना केलं खुश, TRAI च्या नियमानंतर आता केला 'हा' मोठा बदल

Reliance Jio Recharge Plans: काही दिवसांपूर्वी ट्रायनं सर्व टेलिकॉम कंपन्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएस-ओन्ली रिचार्ज प्लान देण्याचे आदेश दिले होते. डेटा न वापरणाऱ्या युजर्सना याचा फायदा होऊ शकेल, असा त्यामागचा हेतू होता. ट्रायच्या या नियमानंतर आता जिओनं फक्त कॉलिंग आणि एसएमएससह रिचार्ज प्लॅन आणले आहेत. जिओच्या या निर्णयाचा फायदा त्या युजर्सना होणार आहे जे फक्त कॉलिंग आणि एसएमएस सेवा वापरतात.

रिलायन्स जिओचे नवे रिचार्ज प्लान तुम्ही ४५८ आणि १९५८ रुपयांत खरेदी करू शकता. जिओच्या या दोन्ही प्लानमध्ये युजर्सला भरपूर फायदे मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या प्लान्सच्या डिटेल्सबद्दल.

जिओचा ४५८ रुपयांचा प्लान

जिओचा नवा ४५८ रुपयांचा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि फ्री १००० एसएमएसचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये युजर्सला जिओ सिनेमा आणि जिओ टीव्हीचा अॅक्सेस देखील मिळतो.

जिओचा १९५८ रुपयांचा प्लान

जिओचा १९५८ रुपयांचा नवा प्लॅन ३६५ दिवस म्हणजेच पूर्ण १ वर्षाच्या वैधतेसह येतो. १ वर्षाची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि ३६०० फ्री एसएमएसचा फायदा मिळतो. त्याचबरोबर जिओ सिनेमा आणि जिओ टीव्हीचा फ्री अॅक्सेसही या प्लानमध्ये समाविष्ट आहे.
जिओनं आपले दोन रिचार्ज प्लॅन आपल्या लिस्टमधून वगळले आहेत. जिओचे हे प्लान ४७९ रुपये आणि १८९९ रुपयांचे आहेत.

Web Title: Jio has made its customers happy after TRAIs rules launched new prepaid plans with only data and voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.