Lokmat Money > बिझनेस न्यूज > टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही

टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही

Reliance Jio tops : ट्रायच्या अहवालानुसार, यावेळी पुन्हा उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओने टेलिकॉम क्षेत्रात बाजी मारली आहे. या स्पर्धेत एअरटेल, व्होडा आणि बीएसएनएल मागे पडले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:53 IST2025-05-08T11:52:44+5:302025-05-08T11:53:43+5:30

Reliance Jio tops : ट्रायच्या अहवालानुसार, यावेळी पुन्हा उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओने टेलिकॉम क्षेत्रात बाजी मारली आहे. या स्पर्धेत एअरटेल, व्होडा आणि बीएसएनएल मागे पडले आहेत.

Jio, Airtel lead subscriber gains in March Vodafone Idea steady BSNL lags | टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही

टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही

Reliance Jio tops : जेव्हापासून जिओने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला आहे, तेव्हापासून इतर कंपन्यांची धुळधाण झालेली पाहायला मिळाली. यातील अनेक कंपन्यांनी आपलं दुकान कायमचं बंद केलं तर काही एकमेकांत विलीन करण्यात आल्या. सध्या बाजारात जिओसोबतएअरटेल, व्होडाफोन आणि बीएसएनएल हे चारच खेळाडू राहिले आहेत. यामध्ये जिओने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने मार्च २०२५ चा दूरसंचार कंपन्यांच्या वापरकर्त्यांचा डेटा जारी केला आहे. डेटानुसार, उद्योगपती मुकेश अंबानींच्या जिओने पुन्हा बाजी मारली आहे.

व्होडाला मोठा धक्का बसला
ट्रायच्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये २१.७४ लाख नवीन वायरलेस ग्राहक जोडून रिलायन्स जिओने भारतीय टेलिकॉम बाजारपेठेत आपले आघाडीचे स्थान मजबूत केले. या काळात भारती एअरटेलने १२.५० लाख नवीन ग्राहक जोडले. दुसरीकडे, व्होडाफोन आयडियाने त्यांच्या नेटवर्कवरून ५.४१ लाख मोबाइल वापरकर्ते गमावले. कंपनीची ग्राहकसंख्या २०.५३ कोटींवर घसरली आहे.

जिओचे सध्या किती वापरकर्ते आहेत?
आकडेवारीनुसार, जिओने मार्च महिन्यात २१.७४ लाख वायरलेस वापरकर्ते जोडले आहे. आता त्यांच्या एकूण ग्राहकांची संख्या ४६.९७ कोटी झाली. दुसऱ्या क्रमांकावर भारती एअरटेल असून त्यांच्या मोबाईल ग्राहकांची संख्या ३८.९८ कोटी इतकी आहे.

ग्रामीण भागातही ग्राहक वाढले
ट्रायने त्यांच्या मासिक ग्राहक जोडणी अहवालात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२५ च्या अखेरीस एकूण वायरलेस (मोबाइल+५जी-एफडब्ल्यूए) ग्राहकांची संख्या ११६.०३ कोटी होती, जी मार्च २०२५ च्या अखेरीस ११६.३७ कोटी झाली. अशाप्रकारे, मासिक वाढीचा दर ०.२८ टक्के होता. शहरी भागातील एकूण वायरलेस ग्राहकांची संख्या फेब्रुवारी २०२५ मध्ये ६३.४ कोटी होती, जी मार्च २०२५ मध्ये ६३.२५ कोटींवर आली. या काळात ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या ५२.६३ कोटींवरून ५३.११ कोटींवर पोहोचली.

जिओ आणि एअरटेलमध्ये तगडी स्पर्धा
जरी ऑपरेटरनिहाय ग्राहकांचा डेटा शेअर केला गेला नसला तरी, मागील कामगिरीच्या आधारे, असे मानले जाते की जिओ आणि एअरटेलने सर्वाधिक नवीन ग्राहक जोडण्यात यश मिळवलं आहे. आर्थिक दबावामुळे व्होडाफोन आयडियाची वाढ मर्यादित राहिली आहे, तर 4G सेवांचा विस्तार करण्यात विलंब झाल्यामुळे बीएसएनएल स्पर्धेत मागे पडत आहे.

वाचा - बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?

बीएसएनएलला सूर सापडेना?
बीएसएनएलने टाटा समूहातील कंपनीशी करार केल्यानंतर टेलिकॉम कंपनीचे नशीब पालटले. त्यांची ग्राहक संख्या प्रचंड वाढली. लागलीच त्यांनी ५जी लाँच करण्याची घोषणाही केली. नवीन सीमकार्ड ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात आले. पण, प्रत्यक्षात बीएसएनएल ग्राहकांना ४जी इंटरनेट चालवण्यातही अडचण येत आहे. पुण्यासारख्या शहरी भागातही नेटवर्क समस्या येत असल्याने ग्राहक कंटाळले आहेत. कंपनीने लवकरच यावर तोडगा काढला नाही तर ग्राहक पुन्हा दुसऱ्या कंपनी नंबर पोर्ट करण्याची शक्यता आहे.

Web Title: Jio, Airtel lead subscriber gains in March Vodafone Idea steady BSNL lags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.