Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jio, Airtel आणि Vi चे ३०० रुपयांपेक्षा स्वस्त प्लान्स; डेली डेटा आणि फ्री कॉलिंग, पाहा लिस्ट

Jio, Airtel आणि Vi चे ३०० रुपयांपेक्षा स्वस्त प्लान्स; डेली डेटा आणि फ्री कॉलिंग, पाहा लिस्ट

Jio Airtel Vi Recharge Plans :जर तुम्हाला कमी किंमतीचे प्लान निवडायचे असतील तर आम्ही ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या जिओ, एअरटेल आणि व्हीआय प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत. अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली डेटा असलेल्या या प्लॅनमधून तुम्ही तुम्हाला हवा असलेला निवडू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:04 IST2024-12-30T15:04:30+5:302024-12-30T15:04:30+5:30

Jio Airtel Vi Recharge Plans :जर तुम्हाला कमी किंमतीचे प्लान निवडायचे असतील तर आम्ही ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या जिओ, एअरटेल आणि व्हीआय प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत. अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली डेटा असलेल्या या प्लॅनमधून तुम्ही तुम्हाला हवा असलेला निवडू शकता.

Jio Airtel and Vi s plans cheaper than Rs 300 Daily data and free calling see list | Jio, Airtel आणि Vi चे ३०० रुपयांपेक्षा स्वस्त प्लान्स; डेली डेटा आणि फ्री कॉलिंग, पाहा लिस्ट

Jio, Airtel आणि Vi चे ३०० रुपयांपेक्षा स्वस्त प्लान्स; डेली डेटा आणि फ्री कॉलिंग, पाहा लिस्ट

Jio Airtel Vi Recharge Plans : भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये स्पर्धा वाढली असून सर्वच कंपन्या आपल्या युजर्सना अनेक प्लानसह रिचार्ज करण्याचा पर्याय देत आहेत. मात्र, जुलैमध्ये रिचार्ज प्लान महाग झाले आहेत, ज्यामुळे अनेक ग्राहक त्रस्त झालेत. जर तुम्हाला कमी किंमतीचे प्लान निवडायचे असतील तर आम्ही ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या जिओ, एअरटेल आणि व्हीआय प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत. अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली डेटा असलेल्या या प्लॅनमधून तुम्ही तुम्हाला हवा असलेला निवडू शकता.

जिओचा २९९ रुपयांचा प्लॅन

जिओ ही एकमेव कंपनी आहे, जी ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दररोज २ जीबी डेटाचा लाभ देत आहे. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लाननं रिचार्ज केल्यास अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस सारखे फायदे मिळतात. याशिवाय जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड अॅप्सचा अॅक्सेस दिला जात आहे. या प्लानमध्ये पात्र ग्राहकांना अनलिमिटेड ५जी डेटा देखील दिला जातो.

जिओचा २५९ रुपयांचा प्लॅन

रोज १.५ जीबी डेटामध्ये तुमचं काम होत असेल तर जिओच्या या स्वस्त प्लाननं रिचार्ज करता येईल. पूर्ण महिन्याच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचा (जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड) अॅक्सेस मिळतो.

एअरटेलचा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

भारती एअरटेलच्या ग्राहकांना या प्लानमध्ये रिचार्ज केल्यावर दररोज १.५ जीबी डेटासह दररोज १०० एसएमएस पाठविण्याचा पर्याय मिळतो. युजर्स सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात आणि या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. रिचार्जवर अपोलो २४/७ सबस्क्रिप्शनशिवाय फ्री हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचा अॅक्सेस दिला जात आहे.

व्हीआयचा २९९ रुपयांचा प्लॅन

२८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये रिचार्जवर दररोज १.५ जीबी डेटाचा लाभ मिळतो. ग्राहक दररोज १०० एसएमएस पाठवू शकतात आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग करू शकतात. यासोबतच ३ जीबी एक्स्ट्रा डेटा, व्हीआय मूव्हीज आणि लाइव्ह टीव्हीचे सबस्क्रिप्शन, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि बिंज ऑल नाईट सारखे बेनिफिट्सही दिले जात आहेत.

व्हीआयचा २९६ रुपयांचा प्लॅन

व्होडाफोन आयडिया युजर्सना या प्लाननं रिचार्ज केल्यास २८ दिवसांची वैधता देत आहे. या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतात. युजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात आणि लाइव्ह टीव्हीव्यतिरिक्त व्हीआय मूव्हिजचा फ्री अॅक्सेसही दिला जात आहे.

Web Title: Jio Airtel and Vi s plans cheaper than Rs 300 Daily data and free calling see list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.