Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास हीच खरी यशाची सूत्रे -मधुकर कोकाटे

जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास हीच खरी यशाची सूत्रे -मधुकर कोकाटे

लोकमत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST2014-08-23T22:04:11+5:302014-08-23T22:04:11+5:30

लोकमत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Jidd, diligence and self-confidence are the only real successes -Madhukar Kokate | जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास हीच खरी यशाची सूत्रे -मधुकर कोकाटे

जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास हीच खरी यशाची सूत्रे -मधुकर कोकाटे

कमत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
हजारो तरुणांनी ऐकले श्रोत्यांना
जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास हीच खरी यशाची सूत्रे -मधुकर कोकाटे
औरंगाबाद : जिद्द, कठोर मेहनत आणि आत्मविश्वास हीच खरी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची सूत्रे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने ही सूत्रे अंगिकारावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे यांनी केले.
लोकमतच्या वतीने सिडकोतील संत तुकाराम महाराज नाट्यगृहात आयोजित स्पर्धा परीक्षा संमेलनप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या हजारो तरुण, तरुणींची या संमेलनाला उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून स्पर्धा परीक्षेसंबंधी पुस्तके लिहिणारे, तसेच राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. तुकाराम जाधव, औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक आयपीएस डॉ. बसवराज तेली, लोकमतचे संपादक चक्रधर दळवी, लोकमत मीडिया प्रा. लि.चे उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी कोकाटेे म्हणाले की, राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) प्रमाणे स्पर्धर परीक्षांच्या अभ्यासक्रमात बदल केला. त्यामुळे सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा सहज देता येते. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. मात्र, जागा मोजक्याच असतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची संधी केवळ एक, दोन गुण कमी पडल्याने हुकते. तेव्हा विद्यार्थ्यांनी एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देत असताना, बँकिंग आणि अन्य क्षेत्रांतील नोकरीचाही पर्याय निवडावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून आयोग उमेदवाराचा बौद्धिक क्षमतेचा शोध घेते, त्यामुळे उमेदवारांनी आत्मविश्वासने परीक्षांना सामोरे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

अपूर्ण......

Web Title: Jidd, diligence and self-confidence are the only real successes -Madhukar Kokate