lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jet Airwaysची विमानं पुन्हा घेणार उड्डाण, डीजीसीएकडून 'ग्रीन सिग्नल'

Jet Airwaysची विमानं पुन्हा घेणार उड्डाण, डीजीसीएकडून 'ग्रीन सिग्नल'

आता कंपनीच्या विमानांचा पुन्हा भारतात उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2023 10:56 AM2023-07-31T10:56:32+5:302023-07-31T10:57:58+5:30

आता कंपनीच्या विमानांचा पुन्हा भारतात उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Jet Airways will take flight again DGCA has renewed the airport operator certificate know details | Jet Airwaysची विमानं पुन्हा घेणार उड्डाण, डीजीसीएकडून 'ग्रीन सिग्नल'

Jet Airwaysची विमानं पुन्हा घेणार उड्डाण, डीजीसीएकडून 'ग्रीन सिग्नल'

Jet Airways Latest News: एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएकडून विमान कंपनी जेट एअरवेजला एअरपोर्ट ऑपरेटर सर्टिफिकेट (AOC) जारी करण्यात आलंय. यानंतर आता कंपनीच्या विमानांचा पुन्हा भारतात उड्डाण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कंपनीनं व्यक्त केला आनंद

जेट एअरवेजला पुन्हा सुरू करण्यासाठी काम करत असलेली जालान-कालरॉक कन्सोर्टियमनं यावर आनंद व्यक्त केलाय. नियामकावरचा आमच्यावर भरवसा कायम आहे हे यावरून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया यानंतर जेट एअरवेजकडून देण्यात आलीये. जालान-कालरॉक कन्सोर्टियमकडून यानंतर एक निवेदनही जारी करण्यात आलंय. डीजीसीए आणि सर्वांना आम्ही धन्यवाद देतो, ज्यांनी जेट एअरवेजला पुन्हा सुरूव करण्यासाठी भरवसा व्यक्त केला असं जालान-कालरॉक कन्सोर्टियमनं नमूद केलंय.

जेट एअरवेजला यशस्वी बनवू
जालान-कालरॉक कन्सोर्टियम पूर्णपणे जेट एअरवेजला पुन्हा उभं करण्यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी जालान-कालरॉक कन्सोर्टियम सर्व अथॉरिटी, इंडस्ट्री आणि सर्वांसह एकत्र मिळून काम करेल. एअरलाईन्सला यशस्वी बनवण्यासाठी आम्ही एक स्ट्रॅटजीही तयार करत आहोत, असंही त्यांनी निवेदनात म्हटलंय.

होता प्रीमिअम पर्याय
जेट एअरवेजची सुरूवात १९९३ मध्ये करण्यात आली होती. प्रवाशांसाठी हा एक प्रीमिअम पर्याय बनला होता. एप्रिल २०१९ मध्ये कामकाज बंद करण्यापूर्वी जेट एअवेडकडून ६५ पेक्षा अधिक ठिकाणांसाठी सेवा पुरवण्यात येत होत्या.

Web Title: Jet Airways will take flight again DGCA has renewed the airport operator certificate know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.