lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jet Airways: 'जेट एअरवेज'ला 'नवसंजीवनी', पुन्हा उड्डाण भरण्यास सज्ज, तारीख ठरली!

Jet Airways: 'जेट एअरवेज'ला 'नवसंजीवनी', पुन्हा उड्डाण भरण्यास सज्ज, तारीख ठरली!

Jet Airways: जेट एअरवेज पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत देशांतर्गत उड्डाणाला सुरुवात करणार आहे. जालान कालरॉक कंसोर्टियमनं (Jalan Kalrock Consortium)याबाबतचं एक पत्रक जारी केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 01:11 PM2021-09-13T13:11:39+5:302021-09-13T13:12:17+5:30

Jet Airways: जेट एअरवेज पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत देशांतर्गत उड्डाणाला सुरुवात करणार आहे. जालान कालरॉक कंसोर्टियमनं (Jalan Kalrock Consortium)याबाबतचं एक पत्रक जारी केलं आहे.

Jet Airways to resume domestic flights early 2022 starts hiring process know the Details | Jet Airways: 'जेट एअरवेज'ला 'नवसंजीवनी', पुन्हा उड्डाण भरण्यास सज्ज, तारीख ठरली!

Jet Airways: 'जेट एअरवेज'ला 'नवसंजीवनी', पुन्हा उड्डाण भरण्यास सज्ज, तारीख ठरली!

Jet Airways: जेट एअरवेज पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत देशांतर्गत उड्डाणाला सुरुवात करणार आहे. जालान कालरॉक कंसोर्टियमनं (Jalan Kalrock Consortium)याबाबतचं एक पत्रक जारी केलं आहे. जेट एअरवेजला नवसंजीवनी मिळाली असून लवकरच नवी दिल्ली ते मुंबई अशी पहिली उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. तर आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा २०२२ सालच्या दुसऱ्या तिमाहीत सुरू केली जाऊ शकते. ( Jet Airways to resume domestic flights early 2022 starts hiring process know the Details)

जेट एअरवेजने दिली नोकरभरतीची जाहिरात; पायलट, केबिन क्रू मेंबर पदे भरणार; जुन्या कर्मचाऱ्यांचे काय?

"जेट एअरवेज २.० चं प्रमुख उद्दीष्ट हे Q1-2022 पर्यंत देशांतर्गत सेवा पुन्हा एकदा सुरू करण्याचं असून २०२२ सालच्या तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा देखील सुरू केल्या जातील. त्यावर वेगानं काम सुरू आहे", असं जालान कलरॉकचे सदस्य आणि जेट एअरवेजचे कार्यकारी अध्यक्ष मुरारी लाल जालान यांनी सांगितलं आहे. 

एअर ऑपरेटर सर्टिफिकेटसह कामकाज सुरू करण्यासाठीची प्रक्रिया याआधीपासूनच सुरू करण्यात आली असून सध्या कंसोर्टियम स्लॉटचं बुकिंग, आवश्यक विमानतळांवरील पायाभूत सुविधा आणि नाइट पार्किंग संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची विमानतळ व्यवस्थापनासोबत चर्चा सुरू आहे, असं जालान कंसोर्टियमच्या सदस्यानं सांगितलं आहे. 

बुडित कर्जामुळं बंद पडली होती जेट एअरवेज
कर्जाचं ओझं वाढल्यामुळे जेट एअरवेज कंपनी २०१९ साली बंद झाली होती. जेट एअरवेज कंपनीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी लिलाव प्रक्रियेत कार्लरॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालान यांच्या कंसोर्टियम कंपनीनं गेल्यावर्षी बोली जिंकली होती. त्यानंतर राष्ट्रीय लॉ ट्रिब्युनलनं नव्या कंपनीला देखील मंजुरी दिली. आता डीजीसीए आणि नागरी उड्डाण मंत्रालयानंही जून २०२२ सालापासून जेट एअरवेजला स्लॉट देण्याची मंजुरी दिलेली आहे. 

Web Title: Jet Airways to resume domestic flights early 2022 starts hiring process know the Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.