सक्तवसुली संचालनालयाने (ED) रिअल इस्टेट कंपनी जेपी इन्फ्राटेक लिमिटेडचे (JP Infratech Ltd.) व्यवस्थापकीय संचालक (MD) मनोज गौर यांना १२,००० कोटी रुपयांच्या हेराफेरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. घर खरेदीदारांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
ईडीने त्यांना प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट (PMLA) अंतर्गत ताब्यात घेतलंय आहे. हा कायदा काळ्या पैशाला पांढरा करण्यापासून प्रतिबंध करतो. मनोज गौर यांनी घर खरेदीदारांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय. ईडी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.
Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
छाप्यात सापडले होते कोट्यवधी रुपये
मे महिन्यात ईडीनं जेपी इन्फ्राटेक, जयप्रकाश असोसिएट्स आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या १५ ठिकाणांवर छापे टाकले होते आणि १.७ कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड जप्त केली होती. ही कारवाई दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि मुंबई येथे पीएमएलए (PMLA) अंतर्गत करण्यात आली होती. जेपी ग्रुपची मुख्य कंपनी जयप्रकाश असोसिएट्स सिमेंट, कन्स्ट्रक्शन, पॉवर, रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटीचा व्यवसाय करते, परंतु सध्या तिचं बहुतेक कामकाज बंद पडलं आहे.
