Prada Product Like Kolhapuri Chappals: इटालियन कंपनी प्राडा कोल्हापुरी चप्पल सारखी दिसणारी उत्पादनं विकत आहे. यामुळे या कंपनीवर टीकेची झोड उठली आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी लक्झरी ब्रँड प्राडावर टीकेचा बाण सोडला. प्राडा भारताच्या सांस्कृतिक वारशाचा फायदा घेत आहे. मात्र, त्याचं श्रेय ते भारतीय कारागिरांना देत नाहीत. प्राडा ही चप्पल एक लाख रुपयांहून अधिक किंमतीला विकत आहे.
गोयंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्राडाच्या नव्या कलेक्शनचा फोटोही शेअर केला आहे. 'प्राडा कोल्हापुरी चप्पलसारखा दिसणारा प्रॉडक्ट १ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकत आहे. आमचे कारागीर तीच चप्पल हाताने ४०० रुपयांना बनवतात. च्यांना नुकसान होतं, जागतिक ब्रँड आपल्या संस्कृतीतून पैसे कमवत असताना त्यांना त्रास होतो. हे अतिशय दु:खद आहे!' असं गोयंका म्हणाले.
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
काय आहे प्रकरण?
इटलीची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलान शहरात प्राडानं नुकताच एक फॅशन शो आयोजित केला होता. यामध्ये मियुसिया प्राडा आणि राफ सिमन्स यांनी आपला नवा कलेक्शन सादर केलं. त्यात कोल्हापुरीसारख्या दिसणाऱ्या चप्पलांचाही समावेश आहे. काही लोक या कलेक्शनला भविष्याची झलक म्हणत आहेत. परंतु, अनेकजण त्यावर टीका करत आहेत. प्राडा श्रीमंत लोकांना डोळ्यासमोर ठेवून उत्पादनं बनवत आहे. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत असल्याचं अनेकांनी म्हटलं.
Prada is selling products looking like Kolhapuri chappals for over ₹1 lakh. Our artisans make the same by hand for ₹400. They lose, while global brands cash in on our culture. Sad! pic.twitter.com/Cct4vOimKs
— Harsh Goenka (@hvgoenka) June 26, 2025
मिळालाय जीआय टॅग
कोल्हापुरी चप्पल महाराष्ट्रातील कोल्हापुरात बनवल्या जातात. या चप्पल १२ व्या शतकापासून बनवल्या जात आहेत. भारत सरकारनं २०१९ मध्ये याला जीआय टॅग दिला. जीआय टॅगचा अर्थ असा की या चप्पल फक्त कोल्हापुरातच बनवता येतात. यामुळे कोल्हापुरी चप्पलची ओळख आणि महत्त्व अबाधित राहतं.