Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारातील चढ-उतारात 'या' IT शेअरची दमदार कामगिरी; तीन दिवसांत दिला ३५% परतावा

शेअर बाजारातील चढ-उतारात 'या' IT शेअरची दमदार कामगिरी; तीन दिवसांत दिला ३५% परतावा

IT stock surge: मध्यपूर्वेतील तणावामुळे शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:06 IST2026-03-11T17:05:37+5:302026-03-11T17:06:34+5:30

IT stock surge: मध्यपूर्वेतील तणावामुळे शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळतोय.

IT stock surge: IT stock performed strongly amidst the ups and downs in the stock market; Gave 35% return in just three days... | शेअर बाजारातील चढ-उतारात 'या' IT शेअरची दमदार कामगिरी; तीन दिवसांत दिला ३५% परतावा

शेअर बाजारातील चढ-उतारात 'या' IT शेअरची दमदार कामगिरी; तीन दिवसांत दिला ३५% परतावा

IT stock surge: मध्यपूर्वेतील तणावामुळे एकीकडे मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर कोसळताना दिसत आहेत, तर दुसरीकडे आयटी क्षेत्रातील कंपनी Happiest Minds Technologies च्या शेअरमध्ये बुधवारी (११ मार्च) जोरदार तेजी पाहायला मिळाली. सलग दुसऱ्या दिवशी या शेअरमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली असून, गुंतवणूकदारांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

शेअरमध्ये ११% वाढ

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर Happiest Minds चा शेअर सुमारे २ टक्क्यांच्या वाढीसह ४४७.६० रुपयांवर उघडला. त्यानंतर काही वेळातच शेअरमध्ये वेगाने वाढ होत सुमारे ११ टक्क्यांची उसळी घेतली आणि तो ४४६.३५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. सकाळी सुमारे ९:४० वाजेपर्यंत हा शेअर ४४३ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. या कालावधीत ११.५ लाखांहून अधिक शेअर्सची देवाणघेवाण झाली. वाढलेला ट्रेडिंग व्हॉल्यूम गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास दर्शवत आहे.

दोन दिवसांत जवळपास ३०% वाढ

आजच्या वाढीसह Happiest Minds च्या शेअरने केवळ दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये सुमारे ३० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मंगळवारी या आयटी शेअरमध्ये जवळपास १८ टक्के वाढ झाली होती. तर, सोमवारीही शेअरमध्ये १५ टक्क्यांची तेजी दिसून आली होती. या वाढीमुळे हा शेअर सध्या Nifty 500 इंडेक्समधील सर्वाधिक वाढ करणारा शेअर ठरला आहे.

शेअरमध्ये वाढ होण्यामागील कारण

बंगळुरूस्थित या कंपनीने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी महसूल वाढीचा अंदाज १० टक्क्यांवरून वाढवून १२.५ टक्के केला आहे. तसेच आर्थिक वर्ष २०२७-२८ पर्यंत कंपनीने १५ टक्के वाढ साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही सकारात्मक वाढ कंपनीने फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरू केलेल्या ‘AI First’ उपक्रमामुळे शक्य झाली असल्याचे सांगितले जात आहे. 

कंपनीनुसार या उपक्रमामुळे संपूर्ण ऑपरेटिंग मॉडेल, सर्व्हिस डिलिव्हरी आर्किटेक्चर आणि क्लायंट एंगेजमेंट स्ट्रॅटेजी एआयभोवती पुन्हा तयार करण्यात आली आहे. कंपनीला या नव्या धोरणाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून एआय-आधारित प्रोजेक्ट्सची मागणीही वाढल्याचे कंपनीने सांगितले आहे.

(विशेष सूचना- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञाचा सल्ला घ्या.)

Web Title : Happiest Minds Technologies के शेयर में उछाल, तीन दिनों में 35% रिटर्न।

Web Summary : बाजार की अस्थिरता के बीच Happiest Minds Technologies के शेयरों में उल्लेखनीय वृद्धि हुई, जिससे तीन दिनों में 35% रिटर्न मिला। यह उछाल संशोधित राजस्व वृद्धि अनुमानों और कंपनी की एआई-फर्स्ट पहल के कारण है, जिससे निवेशकों का विश्वास बढ़ा है।

Web Title : Happiest Minds Technologies stock surges, delivers 35% return in three days.

Web Summary : Happiest Minds Technologies shares jumped significantly amidst market volatility, delivering a 35% return in three days. The surge is attributed to revised revenue growth projections and the company's AI-first initiative, attracting investor confidence and increased trading volume.