Lokmat Money > बिझनेस न्यूज > "दुःखी, गरीब राहणे आपल्यासाठी सोपं, पण..."; नारायण मूर्तींनी पुन्हा दिला ७० तास कामाचा 'डोस'

"दुःखी, गरीब राहणे आपल्यासाठी सोपं, पण..."; नारायण मूर्तींनी पुन्हा दिला ७० तास कामाचा 'डोस'

Narayana Murthy 70 hours: इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा ७० तास करण्याचा मुद्द्यावर जोर दिला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 14:29 IST2024-12-16T14:25:17+5:302024-12-16T14:29:05+5:30

Narayana Murthy 70 hours: इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा ७० तास करण्याचा मुद्द्यावर जोर दिला आहे. 

"It is easy for us to be miserable and poor, but Indians have to work hard," said Narayana Murthy. | "दुःखी, गरीब राहणे आपल्यासाठी सोपं, पण..."; नारायण मूर्तींनी पुन्हा दिला ७० तास कामाचा 'डोस'

"दुःखी, गरीब राहणे आपल्यासाठी सोपं, पण..."; नारायण मूर्तींनी पुन्हा दिला ७० तास कामाचा 'डोस'

Narayana Murthy 70 Hours Controversy: आठवड्यात ७० तास करण्याच्या आपल्या विधानावर इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी अप्रत्यक्षपणे जोर दिला. आपल्या प्रचंड कष्ट करावे लागतील, हे तरुणांनी समजून घ्यायला हवे. भारताला पहिल्या क्रमाकांचे राष्ट्र करण्याच्या दिशेने काम करावे लागेल. जर आपण कष्ट करण्याच्या मनस्थिती नाही आहोत, तर मग कोण करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

१५ डिसेंबर रोजी नारायण मूर्ती हे कोलकाता येथे बोलत होते. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. 

नारायण मूर्ती ८० कोटी भारतीयांच्या रेशनबद्दल काय बोलले?

कार्यक्रमात बोलताना नारायण मूर्ती म्हणाले, "आपण एकदा जर आपली तुलना जगातील सर्वोत्तम कंपन्यांशी केली, तर मी तुम्हाला सांगू शकतो की, भारतीयांकडे करण्यासाठी खूप काही आहे. आपल्याला आपल्या महत्त्वकांक्षा मोठ्या ठेवाव्या लागतील. कारण ८०० मिलियन (८० कोटी) भारतीयांना मोफत रेशन मिळत आहे. याचा अर्थ असा की, ८०० मिलियन भारतीय गरीब आहेत. जर आपण प्रचंड कष्ट करण्याच्या मनस्थितीत नाही, तर मग कोण करणार?", असा सवाल नारायण मूर्ती यांनी उपस्थित केला. 

"इथे एका व्यक्तीने मला सांगितले की, एक चिनी कर्मचारी भारतीय व्यक्तीच्या तुलनेत ३.५ टक्के जास्त काम करतो. आपल्यासाठी निरर्थक गोष्टी लिहिणे, दुःखी, घाणेरडं आणि गरीब राहणे सोपे आहे. त्यामुळे मला वाटतं की, आपण हे म्हणायला नको की, आम्ही ऑफिसमध्ये जाणार नाही. इथे जमलेल्या लोकांना माझी विनंती आहे की, त्यांनी आपले आयुष्य स्वतःचे मूल्य समजून घेण्यासाठी समर्पित करावे", असे नारायण मूर्ती म्हणाले. 

मी सुद्धा डाव्या विचारांचा होतो - नारायण मूर्ती

"एकेकाळी मी सुद्धा डाव्या विचारधारेचा होतो, जेव्हा जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते आणि आयआयटी संस्था स्थापन झाल्या होत्या. माझे वडील त्यावेळी देशात होत असलेल्या असाधारण प्रगतीबद्दल बोलायचे. आम्ही सगळे नेहरू आणि समाजवादाचे चाहते होतो. मला ७० च्या दशकाच्या सुरुवातीला पॅरिसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी फ्रान्सच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याला भेटलो होतो आणि त्यांनी माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती, पण त्याने माझे समाधान झाले नाही", असा अनुभव नारायण मूर्तींनी सांगितला. 

नारायण मूर्ती पुढे म्हणाले की, "मला कळलं की एक देश गरिबीशी लढू शकतो, जर त्याने रोजगार निर्मिती केली तर... ज्यातून खर्च करण्याइतपत पैसा मिळायला हवा. उद्योजक राष्ट्र उभारणी करतात, हे मला जाणवलं, कारण ते रोजगार निर्मिती करतात. ते गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करतात आणि कर भरतात. त्यामुळे कोणताही देश भांडवलवाद स्वीकारत असेल, तर ते चांगले रस्ते, चांगल्या रेल्वे गाड्या आणि चांगल्या पायाभूत सुविधा तयार करू शकतो", असे नारायण मूर्ती म्हणाले. 

Web Title: "It is easy for us to be miserable and poor, but Indians have to work hard," said Narayana Murthy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.