Lokmat Money > बिझनेस न्यूज > IT कंपन्यांच्या शेअर्सना मोठा फटका; विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टीसीएस जोरदार आपटले

IT कंपन्यांच्या शेअर्सना मोठा फटका; विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टीसीएस जोरदार आपटले

IT Stocks Falls: आयटी आणि टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समुळे आज शेअर बाजारावर मोठा दबाव दिसून येत आहे. निर्देशांक २.२८ टक्क्यांनी घसरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:22 IST2025-03-12T12:21:23+5:302025-03-12T12:22:58+5:30

IT Stocks Falls: आयटी आणि टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समुळे आज शेअर बाजारावर मोठा दबाव दिसून येत आहे. निर्देशांक २.२८ टक्क्यांनी घसरला.

IT companie s shares suffer a big blow Wipro Infosys HCL Tech TCS hit hard sensex nifts falls | IT कंपन्यांच्या शेअर्सना मोठा फटका; विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टीसीएस जोरदार आपटले

IT कंपन्यांच्या शेअर्सना मोठा फटका; विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टीसीएस जोरदार आपटले

IT Stocks Falls: आयटी आणि टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समुळे आज शेअर बाजारावर मोठा दबाव दिसून येत आहे. निर्देशांक २.२८ टक्क्यांनी घसरला. टाटा कम्युनिकेशन्स वगळता या निर्देशांकात समाविष्ट असलेले सर्व शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. तर निफ्टीतील टॉप लूजर्सच्या यादीत विप्रो ५ टक्क्यांनी घसरून २६३.१५ रुपयांवर आला आहे. इन्फोसिसचे शेअर्स ४.७८ टक्के आणि एचसीएल टेकचे समभाग ३.६३ टक्क्यांनी घसरले. तर दुसरीकडे टीसीएस २.२३ टक्क्यांनी घसरला.

निफ्टी आयटी निर्देशांकात मोठी घसरण दिसून येत आहे. त्यात ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. यात सामील असलेले सर्व १० शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. टेक महिंद्रा २.२९ टक्क्यांनी घसरला. एलटीआयएम मध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

आयडियात ३.८१ टक्क्यांची घसरण

निफ्टी टेलिकॉम आयटी इंडेक्सचा भाग असलेला ओरॅकल २.४९ टक्क्यांनी घसरला आहे. त्याचप्रमाणे कोफोर्जचे शेअर २.१४ टक्क्यांनी घसरले आहेत. सायंट, टाटा एलेक्सी, बेसॉफ्ट, तेजस नेटवर्क आणि टाटा टेक या कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. तर दुसरीकडे आयडिया ३.८१ टक्के आणि इंडसटॉवर ३.२२ टक्क्यांनी घसरला. पर्सिस्टंट २.८३ टक्क्यांनी घसरला. एलटीटीएसमध्ये २.८१ टक्क्यांची घसरण दिसून आली. एमफॅसिसमध्ये २.७७ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. केपीआयटी टेकमध्येही सुमारे अडीच टक्क्यांची घसरण झाली.

सेन्सेक्समध्ये आयटी शेअर्समध्येही सर्वाधिक घसरण

सेन्सेक्समध्ये आयटी शेअर्सही सर्वाधिक घसरले आहेत. सुरुवातीच्या तेजीनंतर सेन्सेक्समध्ये ४० पेक्षा अधिक अंकांची घसरण झाली. एकेकाळी त्याने ७४३९२ ची पातळी गाठली होती. तर निफ्टीही ७२ अंकांनी घसरून २२,४२५ वर आला. निफ्टी ५० आज २२,५७७ पर्यंत पोहोचल्यानंतर २२,४१० च्या पातळीवर घसरला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: IT companie s shares suffer a big blow Wipro Infosys HCL Tech TCS hit hard sensex nifts falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.