दहशतवादी हल्ल्यांचा आघात केवळ मानवी जीवितावरच नाही, तर आर्थिक स्थैर्यावरही खोल परिणाम करतो. अशा अनिश्चित आणि भयावह घटनांमध्ये विमा संरक्षण ही केवळ एक आर्थिक कवच नसून मानसिक सुरक्षिततेची हमी ठरते. आज अनेक विमा योजना — जसे प्रॉपर्टी विमा, गृह विमा, वाहन विमा, वैयक्तिक अपघात विमा, आरोग्य आणि प्रवास विमा या सर्वांमध्ये 'टेररिझम कव्हर'चा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजेच, दहशतवादी हल्ला झाल्यास त्यातून होणाऱ्या हानीवर सुरक्षा कवच मिळते.
तथापि, सर्व पॉलिसींमध्ये हे संरक्षण आपोआप मिळतेच असे नाही. काही विमा कंपन्या उच्च-जोखीम असलेल्या क्षेत्रांना वगळतात. म्हणूनच पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तिच्या अटी, कव्हरेजची मर्यादा आणि अपवाद काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
विमा तज्ज्ञांच्या मते़, विमा म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे तर आत्मविश्वासाचा आधार आहे. आजच्या वास्तवात, दहशतवादासारख्या आपत्तीवर नियंत्रण शक्य नसले तरी तयारी मात्र आपल्या हातात आहे. असा विमा घेताना हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण फक्त मालमत्तेचेच रक्षणच करत नाही, तर त्यातून आपल्याला सुरक्षिततेची भावनाही निर्माण होते.
