Lokmat Money > बिझनेस न्यूज > IRCTC ची ऑनलाइन सेवा ठप्प, तिकिट बुकिंग बंद, प्रवाशांचे मोठे हाल

IRCTC ची ऑनलाइन सेवा ठप्प, तिकिट बुकिंग बंद, प्रवाशांचे मोठे हाल

IRCTC Down : सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळीच आयआरसीटीसी वेबसाइट ठप्प झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:01 IST2024-12-26T10:59:31+5:302024-12-26T11:01:00+5:30

IRCTC Down : सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळीच आयआरसीटीसी वेबसाइट ठप्प झाली आहे.

IRCTC Down : Indian Railways e-ticketing service unavailable on website and app | IRCTC ची ऑनलाइन सेवा ठप्प, तिकिट बुकिंग बंद, प्रवाशांचे मोठे हाल

IRCTC ची ऑनलाइन सेवा ठप्प, तिकिट बुकिंग बंद, प्रवाशांचे मोठे हाल

IRCTC Down :  रेल्वे तिकिट बुकिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. आयआरसीटीसीची (IRCTC ) वेबसाइट आणि मोबाइल ॲप गुरुवारी (26 डिसेंबर) ठप्प झाले आहे. त्यामुळे रेल्वे तिकिटांचे बुकिंग करता येत नाही. या समस्येमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

रेल्वे तिकीट प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, देखभाल कार्यामुळे म्हणजेच मेंटनेंस अॅक्टिव्हिटीमुळे सध्या ई-तिकीटिंग सेवा उपलब्ध होणार नाही. कृपया नंतर प्रयत्न करा, असा मेसेज देण्यात आला आहे. यासोबत तिकीट रद्द करण्यासाठी /TDR फाइल करण्यासाठी कृपया कस्टमर केअर नंबर 14646,08044647999 आणि 08035734999 वर कॉल करा किंवा etickets@irctc.co.in वर मेल करा, असेही म्हटले आहे.

दरम्यान, याबाबत अनेक युजर्सनी सोशल मीडियावर आपली चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, सहसा आयआरसीटीवर तत्काळ तिकीट बुक करण्याची वेळ सकाळी 10 आहे. तर स्लीपर क्लाससाठी तत्काळ तिकीट बुक करण्याची वेळ सकाळी 11 वाजता आहे. पण, आज (26 डिसेंबर) आयआरसीटी तिकीट प्लॅटफॉर्म ठप्प झाल्यामुळे देशभरातील लाखो लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Web Title: IRCTC Down : Indian Railways e-ticketing service unavailable on website and app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.