Iran War Impact: मध्य-पूर्वेत वाढलेल्या युद्धतणावाचा थेट परिणाम आता भारतीय निर्यातीवर दिसू लागला आहे. अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर केलेल्या हल्ल्यानंतर, इराण आणि अफगाणिस्तानकडे जाणाऱ्या भारतीय तांडळाच्या निर्यातीत अडथळे निर्माण झाले असून, त्याचे पेमेंटही रखडल्याची माहिती समोर आली आहे.
युद्धाचा भारतीय व्यापारावर परिणाम
अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या भीषण हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामनेई यांचा मृत्यू झाला. यानंतर चवताळलेल्या इराणकडून गल्फ देशांवर मोठ्या प्रमाणावर मिसाइल हल्ले केले जात आहेत. या सर्व घडामोडींमुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव वाढला असून, त्याचे पडसाद भारताच्या निर्यात व्यापारावर उमटू लागले आहेत. भारतीय नांदूळ निर्यातदारांच्या मते, आधीच युद्धाची शक्यता असल्याने बाजारात अस्वस्थता होती, मात्र आता प्रत्यक्षात शिपमेंट अडकल्याने अडचणी वाढल्या आहेत.
नेमकी काय अडचण?
पीटीआयच्या अहवालानुसार, हरियाणातील नांदूळ निर्यातदारांना सर्वाधिक फटका बसला आहे. राइस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष सुशील कुमार जैन यांनी सांगितले की, इराण किंवा इराणमधील 'अब्बास बंदर' मार्गे अफगाणिस्तानला जाणारी शिपमेंट सध्या थांबल्या आहेत. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत ही शिपमेंट थांबलेल्याच राहतील. याचा थेट परिणाम बाजारावर होईल आणि पेमेंटमध्येही उशीर होऊ शकतो
हरियाणातील बासमती बाजार सर्वाधिक प्रभावित
भारताच्या एकूण वार्षिक नांदूळ निर्यातीपैकी सुमारे 35 टक्के हिस्सा हरियाणाचा आहे. करनालमधील राइस मिलर नीरज कुमार यांच्या मते, शनिवारी युद्ध सुरू झाल्यापासून बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. फक्त एका दिवसांत व्यापारावर परिणाम दिसून आला. बासमतीच्या दरात प्रतिकिलो 4 ते 5 रुपयांची घसरण झाली असून, याचा अर्थ प्रतिक्विंटल 400 ते 500 रुपयांचा फटका आहे. याआधी जून 2025 मध्ये झालेल्या इराण-इस्रायल संघर्षादरम्यानही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, असे त्यांनी नमूद केले.
इराण भारताचा प्रमुख बासमती खरेदीदार
सौदी अरेबियानंतर इराण हा भारताचा दुसरा सर्वात मोठा बासमती खरेदीदार आहे. मार्च 2025 ला संपलेल्या आर्थिक वर्षात भारताने इराणला सुमारे 10 लाख टन सुगंधी बासमती नांदूळ निर्यात केला होता. त्या वर्षात एकूण सुमारे 60 लाख टन बासमती तांडूळ निर्यात करण्यात आला, ज्याची मागणी प्रामुख्याने मध्यपूर्व आणि पश्चिम आशियाई देशांकडून होती. UAE, ओमान, येमेन आणि इराक हेही भारतासाठी महत्त्वाचे बाजार आहेत. आता या युद्धामुळे मार्च महिन्यातील शिपमेंटवर थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
