Lokmat Money > बिझनेस न्यूज > IPO Update: वर्षअखेरीस पैसा कमावण्याची मोठी संधी! येणार तब्बल 9 आयपीओ

IPO Update: वर्षअखेरीस पैसा कमावण्याची मोठी संधी! येणार तब्बल 9 आयपीओ

IPO News Updates: २०२४ या वर्षाचा शेवटचा महिना सुरू असून, अखेरच्या १५-२० दिवसात आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. कारण वर्ष अखेरीस एक-दोन नव्हे तर तब्बल ९ कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 12:31 IST2024-12-08T12:28:57+5:302024-12-08T12:31:59+5:30

IPO News Updates: २०२४ या वर्षाचा शेवटचा महिना सुरू असून, अखेरच्या १५-२० दिवसात आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. कारण वर्ष अखेरीस एक-दोन नव्हे तर तब्बल ९ कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. 

IPO Update inventurus knowledge solutions limited ipo one mobikwik systems limited ipo Sai Life Sciences IPO Vishal Mega Mart IPO | IPO Update: वर्षअखेरीस पैसा कमावण्याची मोठी संधी! येणार तब्बल 9 आयपीओ

IPO Update: वर्षअखेरीस पैसा कमावण्याची मोठी संधी! येणार तब्बल 9 आयपीओ

IPO Latest News in Maraathi: गेल्या काही वर्षात आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याकडे तसेच पैसे कमावण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. गेल्या वर्षभरात अनेक आयपीओ आले, ज्यांनी गुंतवणुकदारांना भरपूर नफा मिळवून दिला. आता वर्ष संपवण्यास १५-२० दिवस शिल्लक असून या कालावधीत तब्बल ९ आयपीओ येणार आहेत. ते कोणते जाणून घ्या...

डिसेंबरच्या अखरेच्या दिवसांत ९ कंपन्यांचे आयपीओ येणार असून, यात चार मेनबोर्ड आयपीओंचा समावेश आहे. सुपरमार्केट साखळी असणाऱ्या विशाल मेगा मार्ट, मोबिक्विकसह इतर कंपन्याचा समावेश आहे. मोठ्या कंपन्यांसह एसएमई आयपीओही लिस्ट होणार आहेत. 

विशाल मेगा मार्ट आयपीओ (Vishal Mega Mart IPO)

सुपरमार्केट चेन चालवणारी कंपनी विशाल मेगा मार्टच्या आयपीओची साईज 8,000 कोटी रुपये आहे आणि ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून कंपनी 102.56 कोटींचे शेअर विकणार आहे. गुंतवणूकदार 11 डिसेंबर ते 13 डिसेंबरच्या दरम्यान, आयपीओ खरेदी करू शकतील. विशाल मेगा मार्ट आयपीओ 18 डिसेंबर रोजी लिस्ट होईल. प्राईस बँडबद्दल सांगायचं झालं, तर प्रति शेअर 74 ते 78 रुपयांना असणार आहे. लॉट साईज 190 शेअर्सची असून, गुंतवणूकदारांना 14,820 रुपये गुंतवावे लागणार आहेत.   

साई लाईफ सायन्सेस लिमिटेड (Sai Life Sciences IPO)

Sai Life Sciences Limited ने आयपीओच्या माध्यमातून 3,042.62 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात 950 कोटी मूल्य असलेले 1.73 कोटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून 2,092.62 कोटी रुपये किंमतीचे 3.81 कोटी शेअर जारी केले जाणार आहेत. 

sai life sciences limited चा आयपीओ 11 ते 13 डिसेंबर दरम्यान विकत घेता येणार आहे. लिस्टिंगची संभाव्य तारीख 18 डिसेंबर असून, कंपनीने शेअर प्राईस बँड 522 ते 549 रुपये प्रति शेअर आहे. लॉट साईज 27 शेअर्सची असून, गुंतवणूकदारांना 14,823 रुपयांना विकत घ्यावे लागणार आहे.

वन मोबिक्विक सिस्टम्स लिमिटेड (one mobikwik systems limited ipo) 

one mobikwik systems limited च्या आयपीओची साईज 572 कोटी रुपये आहे. हा शेअर 11-13 डिसेंबरच्या दरम्यान खुला होणार असून, शेअर बाजारात 18 डिसेंबरला लिस्ट होईल. प्रति शेअर किंमत 265 ते 279 रुपये आहे. लॉटमध्ये 53 शेअर असणार असून, गुंतवणूकदारांना 14,787 रुपये गुंतवावे लागणार आहेत. 

इन्व्हेटुरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेड (inventurus knowledge solutions limited ipo) 

Inventurus knowledge solutions limited चा आयपीओ 12 डिसेंबर रोजी खुला होणार असून, 16 डिसेंबरपर्यंत खरेदी करता येणार आहे. 19 डिसेंबर रोजी हा आयपीओ शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे. कंपनीकडून अद्याप आयपीओ प्राइस बँड आणि लॉट साईज जाहीर करण्यात आलेला नाही. 

SME श्रेणीतील हे आयपीओ येणार

पुढील आठवड्यात एमएसई श्रेणीत पाच आयपीओ येणार आहेत. धनलक्ष्मी क्रॉप सायन्स आयपीओची साईज 23.80 कोटी रुपये आहे. 9-11 डिसेंबरच्या दरम्यान हा आयपीओ खुला होणार आहे. जंगल कॅम्पस इंडिया आयपीओ 10-12 डिसेंबर दरम्यान खुला असणार आहे. याची साईज 29.42 कोटी रुपये इतकी आहे. 

टॉस द क्वॉईन कंपनीचा आयपीओ 9.17 कोटींचा आहे. पर्पल युनायटेड सेल्सचा आयपीओ येणार असून, त्याची साईज 32.81 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर 50 कोटी रुपयांचा सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंटचा आयपीओही लिस्ट होणार आहे. 

(टीप : यामध्ये केवळ आयपीओची माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: IPO Update inventurus knowledge solutions limited ipo one mobikwik systems limited ipo Sai Life Sciences IPO Vishal Mega Mart IPO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.