Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर

लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर

महत्वाचे म्हणजे, आयपीओची लिस्टिंग अशा वेळी होत आहे, जेव्हा भारतीय बाजार विक्रमी उच्चांकावर आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 01:26 IST2025-11-28T01:26:03+5:302025-11-28T01:26:38+5:30

महत्वाचे म्हणजे, आयपीओची लिस्टिंग अशा वेळी होत आहे, जेव्हा भारतीय बाजार विक्रमी उच्चांकावर आहेत. 

IPO of ICICI's joint venture is coming soon, when will it be launched Know the details | लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर

लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर

भारतीय IPO बाजारात लवकरच आणखी एका मोठ्या कंपनीची एन्ट्री होणार आहे. 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी' (ICICI Prudential Asset Management Company) डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आपला सुमारे १.२ अब्ज डॉलरचा (अब्ज डॉलर्स) IPO लाँच करणार आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली.

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रुडेन्शियलची उपकंपनी या IPO मध्ये १० टक्क्यांपर्यंतची हिस्सेदारी विकणार आहे. कंपनीचे मूल्यांकन (Valuation) १२ अब्ज डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट आहे. दुसऱ्या सूत्राने सांगितले की, ॲसेट मॅनेजर कंपनीला सार्वजनिक ऑफर कागदपत्रांसाठी बाजार नियामकाची मंजुरी मिळाली आहे. उर्वरित औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कंपनी सूचीबद्ध (Listing) होणे अपेक्षित आहे. 

महत्वाचे म्हणजे, नियामकाची मंजुरी अद्याप सार्वजनिक न झाल्याने, सूत्रांनी आपली ओळख सार्वजनिक करण्यास नकार दिला. १८ इन्व्हेस्टमेंट बँकर या IPO चे व्यवस्थापन करणार आहेत.

कोणाचा किती वाटा? -
भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ॲसेट मॅनेजर असलेल्या आयसीआयसीआयकडे कंपनीची ५१ टक्के तर ब्रिटिश विमा कंपनी प्रुडेन्शियलकडे ४९ टक्के हिस्सेदारी आहे. या दोन्ही कंपन्यांचा संयुक्त उपक्रम (Joint Venture) म्हणजे ICICI प्रुडेन्शियल.  ICICI प्रुडेन्शियल भारतात सुमारे १० ट्रिलियन रुपयांच्या (जवळपास ११२ अब्ज डॉलर) मालमत्तेचे व्यवस्थापन करते. मार्च २०२५ पर्यंत संपलेल्या वर्षात कंपनीचा नफा २९.३ टक्क्यांनी वाढून २६.६ अब्ज रुपये झाला आहे. महत्वाचे म्हणजे, आयपीओची लिस्टिंग अशा वेळी होत आहे, जेव्हा भारतीय बाजार विक्रमी उच्चांकावर आहेत. 
 

Web Title : आईसीआईसीआई प्रूडेंशियल का संयुक्त उद्यम आईपीओ जल्द लॉन्च: विवरण

Web Summary : आईसीआईसीआई प्रूडेंशियल एएमसी का ₹10,000 करोड़ का आईपीओ दिसंबर में आने की उम्मीद है। प्रूडेंशियल 10% तक हिस्सेदारी बेच सकती है, जिसका लक्ष्य $12 बिलियन का मूल्यांकन है। नियामक की मंजूरी मिली; लिस्टिंग दिसंबर के तीसरे सप्ताह में होने की उम्मीद है। आईसीआईसीआई के पास 51%, प्रूडेंशियल के पास 49% हिस्सेदारी है।

Web Title : ICICI Prudential Joint Venture IPO Launching Soon: Details Inside

Web Summary : ICICI Prudential AMC's ₹10,000 crore IPO is expected in December. Prudential may sell up to 10% stake, targeting $12 billion valuation. Regulator approval received; listing expected in December's third week. ICICI holds 51%, Prudential 49% stake.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.