Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे iPhone च्या चाहत्यांना धक्का; 30 टक्क्यांपर्यंत किंमत वाढणार...

अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे iPhone च्या चाहत्यांना धक्का; 30 टक्क्यांपर्यंत किंमत वाढणार...

तुम्ही नवीन iPhone खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 15:13 IST2025-05-13T15:10:00+5:302025-05-13T15:13:02+5:30

तुम्ही नवीन iPhone खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागू शकते.

iPhone fans shocked by US-China trade war; Price to increase by up to 30 percent | अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे iPhone च्या चाहत्यांना धक्का; 30 टक्क्यांपर्यंत किंमत वाढणार...

अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे iPhone च्या चाहत्यांना धक्का; 30 टक्क्यांपर्यंत किंमत वाढणार...

Apple लव्हर्ससाठी धक्कादायक बातमी आहे. कंपनी iPhone च्या किमतीत मोठी वाढ करण्याचा विचार करत आहे. रिपोर्ट्सनुसार, अॅपलच्या पुढील लाईन-अपची, म्हणजेच आयफोन 17 सीरिजची किंमत गेल्या वर्षीच्या आयफोन 16 मालिकेपेक्षा जास्त असणार आहे. चीन आणि अमेरिकेतील टॅरिफ वॉरमुळे कंपनी हा निर्णय घेऊ शकते. अॅपलचे बहुतांश iPhone चीनमध्ये असेंबल केले जातात, त्यामुळे फोनच्या किमतीत ही वाढ दिसून येईल.

30 टक्क्यांपर्यंत किंमत वाढणार
भारत आता अॅपलसाठी एक मोठी असेंब्ली बाजारपेठ बनला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, चीन आणि अमेरिकेतील व्यापार करारानंतर 30% परस्पर शुल्क लागू केले जाऊ शकते, ज्यामुळे अॅपलचे आयफोन अधिक महाग होतील. टॅरिफ लादल्यामुळे अॅपलवर $900 मिलियन, म्हणजेच 7,638 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. याची भरपाई करण्यासाठी कंपनी आपल्या आयफोनची किंमत वाढवू शकते. पण, याबद्दल अॅपलकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.  

आयफोन 16 गेल्या वर्षी अमेरिकन बाजारात $799 च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. टॅरिफमुळे त्याची किंमत $1142 पर्यंत वाढू शकते, जी सध्याच्या किंमतीपेक्षा 30 टक्क्यांनी जास्त आहे. दरम्यान, आयफोनचे उत्पादन भारतात झाल्याने कंपनीला फायदा होऊ शकतो. चीनच्या तुलनेत भारतात कमी दर आहेत. 

Web Title: iPhone fans shocked by US-China trade war; Price to increase by up to 30 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.