Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ipad Air: ऑफरने ग्राहकांचाच 'गेम' केला! आधी ७९,९९० चा आयपॅड १५०० रुपयांत दिला, आता रिटेलर म्हणतो...

ipad Air: ऑफरने ग्राहकांचाच 'गेम' केला! आधी ७९,९९० चा आयपॅड १५०० रुपयांत दिला, आता रिटेलर म्हणतो...

लॉयल्टी प्रोग्रामच्या सदस्यांना १३ इंचाचा ॲपल आयपॅड एअर (Apple iPad Air) फक्त सुमारे ₹ १,५०० मध्ये मिळाला. या आयपॅडची खरी किंमत सुमारे ₹ ७९,९९० आहे. पण आता रिटेलरनं ग्राहकांना ईमेल करण्यास सुरुवात केली आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:45 IST2025-11-25T12:42:03+5:302025-11-25T12:45:16+5:30

लॉयल्टी प्रोग्रामच्या सदस्यांना १३ इंचाचा ॲपल आयपॅड एअर (Apple iPad Air) फक्त सुमारे ₹ १,५०० मध्ये मिळाला. या आयपॅडची खरी किंमत सुमारे ₹ ७९,९९० आहे. पण आता रिटेलरनं ग्राहकांना ईमेल करण्यास सुरुवात केली आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊ.

iPad Air offer Earlier iPad of 79990 was offered for 1500 rupees loyalty programme now the retailer asking for whole money | ipad Air: ऑफरने ग्राहकांचाच 'गेम' केला! आधी ७९,९९० चा आयपॅड १५०० रुपयांत दिला, आता रिटेलर म्हणतो...

ipad Air: ऑफरने ग्राहकांचाच 'गेम' केला! आधी ७९,९९० चा आयपॅड १५०० रुपयांत दिला, आता रिटेलर म्हणतो...

iPad Air News: इटलीतील एक मोठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मीडियावर्ल्ड (MediaWorld) सोबत एक विचित्र घटना घडली आहे. त्यांच्या लॉयल्टी प्रोग्रामच्या सदस्यांना चुकून १३ इंचाचा ॲपल आयपॅड एअर (Apple iPad Air) फक्त १५ युरो (सुमारे ₹ १,५००) मध्ये मिळाला. या आयपॅडची खरी किंमत सुमारे ₹ ७९,९९० आहे. वायर्डचया (Wired) एका रिपोर्टनुसार, कंपनीला ही चूक लक्षात येण्यास ११ दिवस लागले. तोपर्यंत, अनेक ऑनलाइन ऑर्डर डिलीव्हर झाल्या होत्या आणि अनेक ग्राहकांनी तर स्टोअरमधूनही आपले आयपॅड घेतले होते.

आता परत मागत आहेत आयपॅड

ही चूक सुधारण्यासाठी, मीडियावर्ल्डनं सर्व ग्राहकांशी संपर्क साधला. त्यांनी ग्राहकांना सांगितलं की, एकतर त्यांनी आयपॅड परत करावा किंवा मग खऱ्या किमतीपर्यंतची उर्वरित रक्कम भरावी. कंपनीला हे सर्व ठीक करताना बरीच अडचण येत आहे, कारण त्यांच्या ऑर्डरच्या अटींमध्ये अशा मूल्यासंबंधी चुकांविषयी काहीही विशेष बाबी नमूद केलेल्या नव्हत्या.

३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा 'ही' आर्थिक कामं, अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं

ग्राहकांना दोन पर्याय

मीडियावर्ल्डने ग्राहकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये सांगितलं की, दर्शवलेली किंमत 'चुकीची' होती. त्यांनी ग्राहकांना दोन पर्याय दिले:

एकतर त्यांनी डिव्हाइस स्वतःकडे ठेवावे आणि उर्वरित रक्कम भरावी.

किंवा मग आयपॅड परत करावा आणि त्यांना भरलेली संपूर्ण रक्कम म्हणजे १५ युरो परत मिळतील. यासोबतच, झालेल्या गैरसोयीबद्दल २० युरोचं (सुमारे ₹ २,०५०) एक व्हाऊचरदेखील मिळेल.

झालेला तांत्रिक बिघाड

मीडियावर्ल्डनं वायर्डला दिलेल्या निवेदनात सांगितलं की, हा एक 'स्पष्टपणे ओळखला जाणारा तांत्रिक बिघाड' होता. हा बिघाड त्यांच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एका अनपेक्षित समस्येमुळे झाला होता. कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, ही चुकीची किंमत आर्थिकदृष्ट्या अशक्य होती. त्यामुळे, कंपनीला त्यात सुधारणा करावी लागली. ते या प्रकरणाचा निपटारा निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Web Title : iPad Air: ऑफर में दिया ₹1500 में, अब वापसी मांग रहा है!

Web Summary : मीडियावर्ल्ड ने गलती से iPad Air ₹1500 में बेचा। कई ऑर्डर देने के बाद, वे अब ग्राहकों से iPad वापस करने या पूरी कीमत चुकाने के लिए कह रहे हैं, तकनीकी खराबी का हवाला देते हुए। असुविधा के लिए ग्राहकों को वाउचर दिया जा रहा है।

Web Title : iPad Air Offered at $18: Retailer Now Asks for Return!

Web Summary : MediaWorld mistakenly offered iPad Air for $18. After delivering many orders, they're now asking customers to return the iPads or pay the full price, citing a technical glitch. Customers are offered a voucher for the inconvenience.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.