Lokmat Money > बिझनेस न्यूज > TCS, HDFC, Airtel, ICICI आणि Infosys चे गुंतवणूकदार मालामाल, 'या' 5 कंपन्यांनी दिला दगा

TCS, HDFC, Airtel, ICICI आणि Infosys चे गुंतवणूकदार मालामाल, 'या' 5 कंपन्यांनी दिला दगा

Share Market : या आठवड्यात, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), HDFC बँक, भारती एअरटेल, ICICI बँक आणि इन्फोसिस यांचे बाजार भांडवल वाढले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 15:03 IST2024-12-15T15:02:30+5:302024-12-15T15:03:26+5:30

Share Market : या आठवड्यात, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), HDFC बँक, भारती एअरटेल, ICICI बँक आणि इन्फोसिस यांचे बाजार भांडवल वाढले.

investors of tcs hdfc airtel icici and infosys made money these 5 companies incurred losses | TCS, HDFC, Airtel, ICICI आणि Infosys चे गुंतवणूकदार मालामाल, 'या' 5 कंपन्यांनी दिला दगा

TCS, HDFC, Airtel, ICICI आणि Infosys चे गुंतवणूकदार मालामाल, 'या' 5 कंपन्यांनी दिला दगा

Share Market : महिन्याभरापासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहे. यामध्ये लाखो गुंतवणूकदारांचा जीव वरखाली होत आहे. गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजार जोरदार बंद झाला. शुक्रवारी चांगला नफा मिळाल्याने गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला. सेन्सेक्सच्या १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी ५ कंपन्यांचे बाजार मूल्यांकन (मार्केट कॅप) गेल्या आठवड्यात १,१३,११७.१७ कोटी रुपयांनी वाढले आहे. मात्र, काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दगा दिल्याचेही पाहायला मिळाले.

भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा झाला. या आठवड्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसचे बाजार भांडवल वाढले, तर रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी), आयटीसी. आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे मूल्यांकन घसरले. गेल्या आठवड्यात बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स ०.७६ टक्क्यांनी वाढला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ०.३६ टक्क्यांनी वधारला.

एअरटेलच्या मार्केट कॅपमध्ये ४७,८३६ कोटी रुपयांची वाढ
समीक्षाधीन आठवड्यात, भारती एअरटेलचे बाजारमूल्य ४७,८३६.६ कोटी रुपयांनी वाढून ९,५७,८४२.४० कोटी रुपयांवर पोहोचले. इन्फोसिसचे मार्केट कॅप ३१,८२६.९७ कोटी रुपयांनी वाढून ८,३०,३८७.१० कोटी रुपये झाले. एचडीएफसी बँकेचे मूल्यांकन ११,८८७.७८ कोटी रुपयांनी वाढून १४,३१,१५८.०६ कोटी रुपये आणि ICICI बँकेचे मूल्यांकन ११,७६०.८ कोटी रुपयांनी वाढून ९,४९,३०६.३७ कोटी रुपये झाले. TCS चे बाजार भांडवल ९,८०५.०२ कोटींच्या उसळीसह १६,१८,५८७.६३ कोटी झाले. याच्या उलट रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ५२,०३१.९८ कोटी रुपयांनी घसरून १७,२३,१४४.७० कोटी रुपयांवर आले.

LIC ची बाजारातील स्थिती घसरली
एलआयसीचे मार्केट कॅप ३२,०६७.७३ कोटी रुपयांनी घसरून ५,८९,८६९.२९ कोटी रुपये झाले. हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) चे मूल्यांकन २२,२५०.६३ कोटी रुपयांनी घसरून ५,६१,४२३.०८ कोटी रुपये झाले. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे बाजारमूल्य २,०५२.६६ कोटी रुपयांनी घसरून ७,६९,०३४.५१ कोटी रुपये झाले. आयटीसीचे मार्केट कॅप १,३७६.१९ कोटी रुपयांनी घसरून ५,८८,१९५.८२ कोटी रुपयांवर आले. टॉप १० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एसबीआय, एलआयसी, आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचा क्रमांक लागतो.

Web Title: investors of tcs hdfc airtel icici and infosys made money these 5 companies incurred losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.