Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदारांचे ४९ लाख कोटी बुडाले; अमेरिका-इराण युद्धामुळे पोर्टफोलिओ लालेलाल झाले

गुंतवणूकदारांचे ४९ लाख कोटी बुडाले; अमेरिका-इराण युद्धामुळे पोर्टफोलिओ लालेलाल झाले

कंपन्यांनाही आर्थिक फटका; विदेशी गुंतवणूदारांनी बाजारातून काढले १ लाख कोटी रुपये; आयटी, मिडकॅप, कंझ्युमर शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 07:46 IST2026-03-24T07:46:44+5:302026-03-24T07:46:44+5:30

कंपन्यांनाही आर्थिक फटका; विदेशी गुंतवणूदारांनी बाजारातून काढले १ लाख कोटी रुपये; आयटी, मिडकॅप, कंझ्युमर शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

investors lose rs 49 lakh crore portfolio turned red due to america iran war Huge losses | गुंतवणूकदारांचे ४९ लाख कोटी बुडाले; अमेरिका-इराण युद्धामुळे पोर्टफोलिओ लालेलाल झाले

गुंतवणूकदारांचे ४९ लाख कोटी बुडाले; अमेरिका-इराण युद्धामुळे पोर्टफोलिओ लालेलाल झाले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अमेरिका-इराण युद्धामुळे भारतीय बाजारात गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ लालेलाल झाले आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या १६ सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल ४८.७२ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बाजारातील सर्वच इंडेक्स घसरल्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला. आयटी, मिडकॅप आणि कंझ्युमर शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

२७ फेब्रुवारी २०२६ रोजी बाजार भांडवल ४६,३२५,२०० कोटी होते, ते २३ मार्च २०२६ रोजी ४१,४५२,९०२ कोटींवर घसरले आहे. या कालावधीत बाजारात चढ-उतार दिसले असले तरी एकूण ट्रेंड घसरणीकडेच राहिला आहे. २० मार्चनंतरच्या घडामोडींमुळे बाजारावर विक्रीचा मोठा दबाव राहिला आहे. २० मार्च ते २३ मार्च या कालावधीतच सुमारे १४.२३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, या कालावधीतील ही सर्वांत मोठी घसरण आहे. 

बाजारातून काढले तब्बल १ लाख कोटी रुपये

अमेरिका-इराण-इस्रायल संघर्ष तीव्र झाल्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसे काढले आहेत. २६ फेब्रुवारी ते २० मार्चदरम्यान विदेशी गुंतवणूकादारंनी मार्केटमधून तब्बल १,००,०४० कोटी रुपये काढून घेतले. सुमारे १६ ट्रेडिंग दिवस (प्रत्येकी सुमारे ६ तास) धरल्यास, दर ट्रेडिंग तासाला जवळपास १,००० कोटी रुपये बाजारातून बाहेर पडल्याचे चित्र दिसते. २०२६ मध्ये आतापर्यंत झालेल्या ५० ट्रेडिंग सत्रांपैकी ३३ सत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीच केली आहे.

आत्मविश्वास झाला कमी 

युद्धाचा फटका बाजारातील मोठ्या कंपन्यांनाही बसला आहे. टॉप १० कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ९,६७१,०५९ कोटींवरून घसरून ८,७२९,१७० कोटींवर आले आहे. या काळात बाजारात सूचीबद्ध कंपन्यांची संख्या ५,९३७ वरून ५,९५५ पर्यंत वाढली. मात्र, त्याच वेळी एकूण बाजारमूल्यात मोठी घट झाली. म्हणजेच नवीन लिस्टिंग असूनही बाजाराचा आत्मविश्वास कमी झाल्याचे चित्र आहे.

जागतिक बाजारही लाल

आशियाई बाजारात कोस्पी (६.४९%) सर्वाधिक घसरला. याशिवाय निक्केई २२५, शांघाय कंपोझिट आणि हँगसेंग निर्देशांकातही मोठी घसरण झाली. युरोपियन बाजारही तोट्यात व्यवहार करत होते, तर अमेरिकन बाजार शुक्रवारी मोठ्या घसरणीसह बंद झाले होते. ट्रम्प यांनी पाच दिवस युद्ध विरामाची घोषणा करताच शेअर बाजार उसळले आहेत.

शेअर बाजार कोसळत असताना काय करावे? 

परिस्थिती -  बाजार झपाट्यान घसरतो,  पोर्टफोलिओ तोट्यात जातो, हातात रोख रोख असणे

गुंतवणूकदार काय करतात? - एसआयपी थांबवतात, घाबरून विक्री करतात, बाजाराचा तळ येण्याची वाट पाहतात

त्याऐवजी काय करावे? - कमी किमतींचा फायदा घेण्यासाठी एसआयपी सुरू ठेवा. गुंतवणूक कायम ठेवा आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर ठाम राहा. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा.

महिनाभरात कोणते इंडेक्स घसरले?

इंडेक्स घसरण     १ महिन्यात     ३ महिन्यांत
निफ्टी ५०      १२%      १४% 
निफ्टी बँक      १६%      १३% 
सेन्सेक्स      १२%      १५% 
निफ्टी मिडकॅप      १०%      १३% 
बीएसई बँकेक्स      १५%      १३% 
निफ्टी टोटल मार्केट      १२%      १४% 
निफ्टी ऑटो      १५%      १४% 
निफ्टी स्मॉलकॅप      १२%      १४% 
निफ्टी एफएमसीजी      १२%      १७% 


 

Web Title : अमेरिका-ईरान युद्ध के डर से निवेशकों को 49 लाख करोड़ का नुकसान

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के कारण भारतीय निवेशकों को 16 सत्रों में ₹48.72 लाख करोड़ का नुकसान हुआ। सभी सूचकांकों में गिरावट आई, जिससे आईटी, मिडकैप और उपभोक्ता शेयरों को सबसे ज्यादा नुकसान हुआ। विदेशी निवेशकों ने ₹1 लाख करोड़ निकाले, जिससे बाजार का विश्वास प्रभावित हुआ क्योंकि वैश्विक बाजार भी गिर गए।

Web Title : Investors lose ₹49 lakh crore amid US-Iran war fears.

Web Summary : Indian investors lost ₹48.72 lakh crore in 16 sessions due to US-Iran tensions. All indices declined, hitting IT, midcap, and consumer shares hardest. Foreign investors withdrew ₹1 lakh crore, impacting market confidence as global markets also slumped.