Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक

'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक

Advani hotels share price: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. पाहा कोणता आहे हा स्टॉक.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:33 IST2025-12-10T15:32:51+5:302025-12-10T15:33:27+5:30

Advani hotels share price: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. पाहा कोणता आहे हा स्टॉक.

Investors jump on the shares Advani Hotels and Resorts India Limited debt free company Price is below rs 60 radhakishan Damani also invested | 'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक

'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक

Advani hotels share price: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड (Advani Hotels & Resorts India Limited). या स्टॉकमध्ये बुधवारी तुफान तेजी दिसून आली. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर सुमारे ५% नी उसळी घेऊन ५५.५७ रुपयांच्या मागील बंदच्या तुलनेत ५८.१७ रुपये च्या स्तरावर पोहोचला. मे २०२५ मध्ये या शेअरचा नीचांक ५०.१२ रुपये होता, तर डिसेंबर २०२४ मध्ये तो ७४.५० रुपयांच्या उच्चांकावर होता.

कर्जमुक्त आहे कंपनी?

१९८७ मध्ये सुरू झालेली ही कंपनी गोव्यात असलेले २०१ खोल्यांचे ५-स्टार डिलक्स 'कॅरावेला बीच रिसॉर्ट' चालवते. सुमारे ₹५०९ कोटी मार्केट कॅप असलेल्या या कंपनीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिच्यावरील कर्ज जवळपास शून्य आहे, ज्यामुळे तिच्या नफ्यावर व्याज देण्याचं कोणतंही ओझं पडत नाही. यामुळेच कंपनी आपल्या कमाईचा मोठा हिस्सा डिव्हिडंड म्हणून गुंतवणूकदारांना परत करण्यास सक्षम आहे. सध्या कंपनी ३.४% चा डिव्हिडंड यील्ड देत आहे, जो या क्षेत्रातील प्रतिस्पर्धकांच्या तुलनेत खूप चांगला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार

दिग्गज गुंतवणूकदाराची गुंतवणूक

दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांचीही या कंपनीत गुंतवणूक आहे. ते २०१५ पासून या कंपनीत गुंतवणूकदार म्हणून कायम आहेत आणि सध्या त्यांचा ४.२% हिस्सा आहे, ज्याची किंमत सुमारे ₹२१ कोटी आहे.

शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचं झाल्यास, प्रवर्तकांकडे ५०.२५ टक्के हिस्सा आहे, तर ४९.७५ टक्के हिस्सा पब्लिक शेअरहोल्डर्सकडे आहे. अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडच्या आर्थिक कामगिरीवर नजर टाकल्यास, FY20 मध्ये ₹७० कोटी असलेली विक्री FY25 मध्ये वाढून ₹१०७ कोटी झाली. याच कालावधीत EBITDA ₹१७ कोटींवरून ₹३५ कोटींवर पोहोचला. तर, निव्वळ नफा ₹११ कोटींवरून वाढून ₹२६ कोटींपर्यंत पोहोचला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : ₹60 से कम के कर्ज-मुक्त शेयर पर निवेशकों की भीड़; दमानी का भी निवेश

Web Summary : अडवाणी होटल्स के शेयर में उछाल, राधाकिशन दमानी का निवेश। लगभग कर्ज-मुक्त कंपनी, जिसका बाजार पूंजीकरण ₹509 करोड़ है, 3.4% का लाभांश उपज देती है। बिक्री ₹70 करोड़ (FY20) से बढ़कर ₹107 करोड़ (FY25) हो गई, और शुद्ध लाभ में काफी वृद्धि हुई। निवेशकों को निवेश से पहले विशेषज्ञों से सलाह लेने की सलाह दी जाती है।

Web Title : Investor Surge on Debt-Free Stock Under ₹60; Damani Invested

Web Summary : Advani Hotels' stock surged, backed by Radhakishan Damani's investment. The near-debt-free company, with a ₹509 crore market cap, boasts a 3.4% dividend yield. Sales rose from ₹70 crore (FY20) to ₹107 crore (FY25), with net profit increasing significantly. Investors are advised to consult experts before investing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.