शेअर बाजारातील आयपीओ बाजार यंदा प्रचंड तेजीत आहे. २०२५ हे वर्ष आयपीओ संख्येच्या आणि भांडवल उभारणीच्या बाबतीत नवीन विक्रम करत २०२४च्या ऐतिहासिक कामगिरीलाही मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. यंदा आतापर्यंत ८७ कंपन्यांनी आयपीओद्वारे १.५ लाख कोटी रुपयांहून अधिक निधी उभारलाय. गेल्या वर्षी ९१ कंपन्यांनी १.६ लाख कोटी रुपये उभारले होते. त्यामुळे २०२५ हे वर्ष २०२४चा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे.
...या कंपन्यांची सर्वाधिक चर्चा
यंदाच्या आयपीओ बाजारात सर्वाधिक झळकलेली कंपनी म्हणजे हायवे इन्फ्रास्ट्रक्चर. लिस्टिंगवर तिचा शेअर ७५% पेक्षा जास्त उसळला होता. यानंतर अर्बन कंपनीत ६२%, आदित्य इन्फोटेकमध्ये ६०% वाढ झाली आहे. क्वॉड्रंट फ्यूचर टेक, एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया, फिजिक्सवाला या कंपन्यांचे शेअर्सही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
कोण आहेत पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर? WinZO च्या संस्थापकांना अटक, कारण काय?
ओएम फ्रेट फॉरवर्डर्स लिस्टिंगच्या दिवशी सर्वाधिक कोसळणारा आयपीओ ठरला. कंपनीचा शेअर तब्बल ३५% घसरला. ग्लॉटिस, बीएमडब्ल्यू व्हेंचर्स हे अनुक्रमे २३% आणि २१% कोसळले आहे. शिवाय ॲरिसइन्फ्रा सोल्यूशन्स, जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक आणि लक्ष्मी इंडिया फायनान्सही प्रमुख घसरणीच्या यादीत आहेत.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
