लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) नेतृत्वाखाली सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत विक्रमी ४९ हजार ४५६ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला असून ते मालामाल झाले आहेत.
गेल्या ६ महिन्यांतच निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक २७% पेक्षा जास्त वाढला, तर या काळात सेन्सेक्स फक्त ३.३%, निफ्टी ४.६५% व निफ्टी बँक निर्देशांक ५.२९% वाढला आहे. अनेक पीएसबींचे शेअर्स ३० ते ७०% ने वाढले आहेत.
स्वस्त स्टॉक नेमके कोणते?
- कंझ्युमर ड्युरेबल्स ६७.७
- निफ्टी रियल्टी ४६.०
- एफएमसीजी ४१.३
- सेन्सेक्स २३.०
- निफ्टी ५० २२.७
- निफ्टी बँक १६.३
- पीएसयू बँक ८.५४
(पीई रेशो मूल्यांकन, प्रति शेअर कमाई तुलनेत शेअरची किंमत (पीई)च्या पट)
बँका का फायद्यात?
चांगले तिमाही निकाल, कमी होत असलेला एनपीए आणि स्वस्त मूल्यांकन गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. सरकारी बँकांमध्ये परकीय गुंतवणुकीची मर्यादा २०% वरून ४९% पर्यंत वाढवण्याच्या शक्यतेमुळेही शेअर्स वाढत आहेत.
