Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?

गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?

आज कंपनीचा शेअर १८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. डिक्सन टेक्नॉलॉजीचे मार्केट कॅपही ७०,००० कोटींच्या खाली आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:52 IST2026-01-13T16:51:41+5:302026-01-13T16:52:05+5:30

आज कंपनीचा शेअर १८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. डिक्सन टेक्नॉलॉजीचे मार्केट कॅपही ७०,००० कोटींच्या खाली आले आहे.

Investor tension has increased dixon technologies ltd stock has been falling for three days what do experts say | गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?

गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?

डिक्सन टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण दिसत आहे. हा शेअर मंगळवारी ५ टक्क्यांहून अधिक घसरला. कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचा हा सलग तिसरा दिवस आहे. आज कंपनीचा शेअर १८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. डिक्सन टेक्नॉलॉजीचे मार्केट कॅपही ७०,००० कोटींच्या खाली आले आहे.

कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १८,४७१.५० -
डिक्सन टेक्नॉलॉजीचा शेअर्स ११,९०२.८० वर खुला झाला होता. दिवसभरात, कंपनीचा शेअर्स ५.५८ टक्क्यांनी घसरून ११,१८२.१० या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. हा कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १८,४७१.५० एवढा आहे. अर्थात सध्या कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा ४० टक्क्यांहून अधिक खाली व्यवहार करत आहेत. महत्वाचे म्हणजे, २०२६ मध्ये ९ पैकी ६ ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीचे शेअर्स घसरला आहे.

काय म्हणतायत तज्ज्ञ? -
CNBC TV18 च्या वृत्तानुसार, ब्रोकरेज HSBC ने BUY रेटिंग जारी केले आहे. मात्र, ब्रोकरेज हाउसने आपली टार्गेट प्राइस ₹19,600 वरून ₹15,500 पर्यंत कमी केली आहे. ब्रोकरेज हाउसने 2026 ते 2028 पर्यंत डिक्सन टेक्नॉलॉजीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवया, इन्व्हेस्टेकने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या नोटमध्ये ₹18,900 एवढी टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Investor tension has increased dixon technologies ltd stock has been falling for three days what do experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.